एक्स्प्लोर
Nagpur News: ‘एम्स’ मध्ये कचऱ्याच्या पुनर्वापरातून बहरले सौंदर्य; कचऱ्यातून कलेचा दिला संदेश
Nagpur News : उपराजधानीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) टाकाऊ प्लास्टिक बाटल्या, निकामी टायर्स आदी साहित्यांपासून अनोखे सेल्फी पाॅईंट साकारण्यात आले आहे.
AIIMS Nagpur
1/10

नागपुरातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) रोजच्या वापरतील टाकाऊ वस्तूंचा पुरेपूर वापर करत सौंदर्य फुलवले आहे.
2/10

ज्यामध्ये प्लास्टिक बाटल्या, निकामी टायर्स, दवाखान्यातील टाकाऊ साहित्य आदी साहित्यांपासून अनोखे सेल्फी पाॅईंट साकारण्यात आले आहे.
3/10

देशाच्या मध्यस्थानी असलेल्या नागपूर शहरातील एम्स येथे उपचार घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण येथे येत असतात. या टाकाऊ कचऱ्याच्या पुनर्वापरातून साकारलेले ही कलाकृती सऱ्यांच्याच कौतुकाचा विषय ठरत आहे.
4/10

तेथे छायाचित्र काढण्यासाठी तपासणीला येणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक चांगलीच गर्दी करत असल्याचे चित्र आहे.
5/10

एम्सचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्या संकल्पनेतून सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला आहे. एम्समध्येही टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्या, वाहनांचे निकामी टायर, प्लास्टिक कचरा नष्ट कसा करायचा ही एक समस्या होती.
6/10

रुग्णालयात येणाऱ्यांकडून मोकळ्या जागेत कचरा टाकण्यात येत होता. या सर्वांवर पर्याय म्हणून व कचऱ्यातून सौंदर्य फुलवणे शक्य असल्याचा संदेश नागरिकांना देण्यासाठी डॉ. श्रीगिरीवार यांनी वरील उपक्रम हाती घेतला.
7/10

टाकाऊ प्लास्टिक बाटल्या, टायरचे तुकडे, सर्जिकल रसायनांचे डबे, पीपीई किट्स, तुटलेले वाॅश बेसिन, टाॅयलेट सीट्चा वापर करून त्यात त्यांनी सुंदर झाडे फुलवली.
8/10

या सर्व झाडांसह साहित्यांना आकर्षत पद्धतीने ठेऊन त्याचा एम्समध्ये एक सुंदर सेल्फी पाॅईंट तयार करण्यात आला. यातून नागरिकांना कचऱ्यातून कलेचा संदेश देण्यात आला. या उपक्रमात एम्सच्या डॉ. नीलम, ज्योती लाटवाल आणि चचाणे यांचेही महत्त्वाचे योगदान लाभले.
9/10

“एम्स अथवा इतरही संस्थांमध्ये प्लास्टिकसह इतरही कचऱ्याची विल्हेवाट हा चिंतेचा विषय आहे. या कचऱ्याच्या पुनर्वापरातूनही सौंदर्य फुलवणे शक्य आहे. एम्सच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी एकत्र येत ही कल्पना वास्तवात आणून दाखवली.
10/10

शहरात या पद्धतीचे सौंदर्यीकरण नागरिकांना कचऱ्याचा सदुपयोग करण्याचा संदेश देऊ शकेल. त्यासाठी समाजाने सामुहिक प्रयत्न करण्याची गरज आहे. असे मत एम्सचे वैद्यकीय अधीक्षक प्रा. डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी बोलतांना व्यक्त केले.
Published at : 08 Jan 2024 07:33 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र























