एक्स्प्लोर
Mumbai Rain updates: मुंबईत सकाळी 10 वाजता अंधार, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहनांचे हेडलाईट ऑन, प्रचंड वाहतूक कोंडी PHOTO
Mumbai Rain updates: सांताक्रुझ विलेपार्ले,अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड या सर्व भागांमध्ये मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
Mumbai Rain updates
1/8

मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाचा जोर वाढला आहे. तर दक्षिण मुंबईतीही अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे.
2/8

अंधेरी, वांद्रे, गोरेगावर परिसरात सगळीकडे अंधार झालेला आहे. मुंबईत रात्रभर तुफान पाऊस झाला. तर आज सकाळी देखील मुसळधार पाऊस सुरु आहे.
3/8

मुंबईत आज पहाटेपासून सुरू असलेला मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
4/8

पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोरिवलीकडून वांद्रेच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसत आहे.
5/8

सांताक्रुझ विलेपार्ले,अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड या सर्व भागांमध्ये मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
6/8

बोरिवली ते वांद्रे हा एक तासाचा प्रवासआहे. मात्र वाहन चालकांना दोन ते अडीच तासांमध्ये पार करावा लागत आहे.
7/8

पश्चिम उपनगरात ढगाळ वातावरण असून जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे रस्त्यावर व्हिजिबिलिटी खूप कमी आहे. त्यामुळे वाहन चालक हेडलाईट चालू करून गाड्या चालवत आहेत.
8/8

सध्या ही वाहतूक कोंडी काढण्याचा प्रयत्न वाहतूक पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे.
Published at : 26 May 2025 09:56 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
























