एक्स्प्लोर
Mumbai Local Train: डोंबिवलीत आज पुन्हा भयावह दृश्य; आरपीएफ पोलिसांनी प्रवाशांना ट्रेनमध्ये अक्षरश: ढकलून कोंबलं
Mumbai Local Train: आज डोंबिवलीत गर्दीमुळे एसी लोकलचे दरवाजे बंद होत नव्हते.
Mumbai Local Train
1/7

मध्य रेल्वेमार्गावरील मुंब्रा स्थानकाजवळ सोमवारी 13 प्रवासी चालत्या लोकल ट्रेनमधून खाली पडल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला होता तर नऊजण जखमी झाले होते. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर मुंबईकरांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला होता.
2/7

मध्य रेल्वेच्या उशीरा धावणाऱ्या लोकल ट्रेन (Mumbai Local Train) आणि कोलमडलेल्या नियोजनामुळे वारंवार निर्माण होणाऱ्या समस्यांचा मुद्दा ऐरणीवर आला होता.
3/7

या दुर्घटनेनंतरही आज डोंबिवली रेल्वे स्थानकात भयंकर दृश्य दिसून आले.
4/7

डोंबिवली फलाट क्रमांक पाच वरून जलद गतीने धावणारी एसी लोकल डोंबिवली स्टेशनवर आल्यावर प्रवाशांची पुन्हा गर्दी पाहायला मिळाली.
5/7

लोकलमधील गर्दीमुळे एसी लोकलचे दरवाजे बंद होत नव्हते. त्यामुळे अनेक प्रवाशांना जबरदस्तीने आरपीएफचे जवान लोकलमध्ये ढकलताना दिसले.
6/7

एसी लोकलसाठी जवानांना तैनात करण्यात आले आहे. दररोज 8.59 वाजताच्या एसी लोकलला नेहमी प्रवाशांना आत ढकलावे लागत असल्याची माहिती सुरक्षा बल जवानाने दिली आहे.
7/7

कुठल्याही प्रकारची माहिती न देता जलद गतीने धावणारी एसी लोकल रद्द केली. त्यामुळे धीम्या गतीने धावणाऱ्या एसी लोकलमध्ये जास्त गर्दी झाली.
Published at : 11 Jun 2025 10:33 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























