एक्स्प्लोर
आझाद मैदान मोकळं करा, आंदोलनकर्त्यांना BMC चा आदेश
azad_maidan6
1/6

मुंबईत १४४ कलम लागू झाल्यानंतर आझाद मैदानावरील एसटी आंदोलनाला फटका, नियमाप्रमाणे मैदान खाली करण्याच्या पोलिसांच्या सूचना
2/6

सकाळी ५ ते संध्याकाळी ५ पर्यंतच आंदोलन करण्याची परवानगी, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर निर्णय घेण्यात आला आहे. सर्व आंदोलकांकडून मैदान खाली करण्यास सुरुवात, एसटी आंदोलकांकडूनही मैदान खाली .
3/6

यापुढे १४४ लागू असेपर्यंत मोजक्याच लोकांसोबत, मोजक्याच वेळेत आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
4/6

दरम्यान, एसटी आंदोलकांनी ह्या सर्व गोष्टी मान्य करत आपले आंदोलन सुरुच ठेवण्याच्या इशारा दिला आहे. सर्व नियम पाळत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचं आंदोलकांकडून सांगण्यात येत आहे.
5/6

राज्यात दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. 31 डिसेंबरपासून राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
6/6

मुंबईतही कोरोनाबाधित रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. त्यामुळे राज्यात निर्बंध लावण्यात आले आहेत.
Published at : 01 Jan 2022 06:36 PM (IST)
Tags :
Azad Maidanआणखी पाहा























