MS Dhoni tractor : कॅप्टन कूल एमएस धोनीचं बाईक प्रेम जगजाहीर आहे. पण सध्या धोनी शेतीमध्ये रमल्याचं दिसतेय. लॉकडाऊनच्या काळात धोनी शेतात घाम गाळत असल्याचे पाहायला मिळाले होतं.
2/9
आता धोनी पुन्हा एकदा शेतात रमल्याचं पाहायला मिळालेय. धोनीचा ट्रॅक्टर चालवतानाचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.
3/9
एमएस धोनीनं इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केलाय. त्या व्हिडीओत धोनी शेतात ट्रॅक्टर चालवत असल्याचं दिसतेय.
4/9
धोनीनं तब्बल दोन वर्षानंतर इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. तोही शेतात ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडीओ आहे. कोरोना काळात धोनीने टमाटर, गोबी, पपई अश्या अनेक फळ भज्यांची लागवड केली आहे.
5/9
फावल्या वेळात धोनी शेतामध्ये आणि बाईकमध्ये आपला दिवस घालवत असतो... धोनीने शेतात ट्रॅक्टर चालवून नांगरणी करण्याचा आनंद घेतला आहे.
6/9
इन्स्टाग्राम व्हिडीओ शेअर करताना धोनीनं कॅप्शनमध्ये म्हटले की, "काहीतरी नवीन शिकून आनंद झाला, पण काम पूर्ण व्हायला खूप वेळ लागला."
7/9
धोनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. नेटकरी या व्हिडीओवर लाईक्स अन् कमेंट्सचा वर्षाव झालाय.
8/9
एमएस धोनी हा जगातील महान कर्णधारांपैकी एक आहे. धोनीनं भारताला आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. मात्र निवृत्तीनंतर माही आपल्या आयुष्याचा आनंद लुटताना दिसत आहे.
9/9
तो सध्या शेतीत रमला आहे. पण आयपीएलच्या आगामी हंगामात धोनी चेन्नई संघाचं नेतृत्व करणार आहे. त्याआधी धोनी शेतकरी झाल्याचं पाहायला मिळालेय.