कोणताही देश वाचणार नाही, सर्वांवर टॅरिफ लावणार, चीन सारख्या देशांना तर...डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
Donald Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफमधून कोणताच देश वाचणार नसल्याचं म्हटलं. चीन सारख्या देशाला तर नाहीच, असं ट्रम्प म्हणाले.

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्याही देशाला टॅरिफमधून सूट दिली जाणार नसल्याचं म्हटलं. 90 दिवसांच्या कालावधीसाठी टॅरिफला स्थगिती देण्यात आली आहे, त्यामधील वस्तूंवर पुढील काळात टॅरिफमधून स्थगिती नसेल. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की टॅरिफसाठी कोणताही अपवाद जाहीर करण्यात आलेला नाही, कोणत्याही देशाला सूट दिली जाणार नाही. चीनमध्ये निर्मिती झालेल्या सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स या सारख्या वस्तूंवर अजिबात सूट दिली जाणार नाही. सुरुवातीला वाढत्या किमती नियंत्रित करण्यासाठी सूट दिली गेली होती, असं ट्रम्प म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प पोस्ट फॉर्म हिज ट्रथ सोशल या अकाऊंटवरुन याबाबत माहिती देण्यात आली. ट्रम्प म्हणाले की इतर देशांकडून आमच्या देशाविरुद्ध अयोग्य व्यापार संतुलन आणि अवित्तीय टॅरिफला उत्तर रोखण्यासाठी दुसरा उपाय नाही. चीननं आतापर्यंत आमच्यासोबत चुकीचा व्यवहार केला आहे. शुक्रवारी टॅरिफमधून कोणत्याही प्रकारची सूट देण्यात आलेली नाही. अमेरिका इलेक्ट्रॉनिक्सच्या पुरवठ्यासाठी सप्लाय चेन निर्मिती करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. यासाठी सेमीकंडक्टर क्षेत्रात राष्ट्रीय सुरक्षा व्यापार चौकशी सुरु करण्यात आली आहे. अमेरिका देशांतर्गत पातळीवर अधिक उत्पादन करण्यासाठी आणि विदेशी उत्पादनांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी लक्ष केंद्रीत करत आहे. प्रामुख्यानं चीन सारख्या देशांवरील अवलंबित्व कमी करायचं असल्याचं ते म्हणाले.
व्हाइट हाऊसकडून शुक्रवारी परस्पर शुल्कातून काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना टॅरिफमधून वगळण्यात आलं होतं. ज्यामुळं अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार संघर्षावर मार्ग निघेल असा अंदाज तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योग जगतातून वर्तवला जात होता. मात्र, वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी स्पष्ट केली की चीनमधून येणाऱ्या तंत्रज्ञान उत्पादनं, सेमीकंडक्टरवर दोन महिन्यात नव्या करांचा सामना करावा लागेल. हे कर ट्रम्प टॅरिफ पेक्षा वेगळे असतील.
NOBODY is getting “off the hook” for the unfair Trade Balances, and Non Monetary Tariff Barriers, that other Countries have used against us, especially not China which, by far, treats us the worst! There was no Tariff “exception” announced on Friday. These products are subject to… pic.twitter.com/PDNoJmBS9f
— Donald J. Trump Posts From His Truth Social (@TrumpDailyPosts) April 13, 2025
येत्या दोन महिन्यात 'या' वस्तूंवर टॅरिफ
ल्यूटनिक यांनी म्हटलं की स्मार्टफोन, कॉम्प्युटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर नवे टॅरिफ येत्या एक ते दोन महिन्यात लागू केले जातील. यामुळं अमेरिकेतील देशांतर्गत उत्पादन वाढू शकते. चीननं अमेरिकेवर 125 टक्के टॅरिफ लादलं आहे.
गुंतवणूकदार बिल एकमॅन यांनी येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत चीनवर टॅरिफ लादू नये,अशी विनंती ट्रम्प यांना केली. अमेरिकन व्यवसायांना सप्लाय चेन रुपांतरीत करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी 10 टक्के कर कपातीचा सल्ला दिला. या दरम्यान सिनेटर एलिझाबेथ वॉरेन यांनी टॅरिफ रणनीतीवर टीका केली. त्यांनी संभाव्य आर्थिक नुकसानाचा इशारा दिला.

























