एक्स्प्लोर
Karun Nair: करुण नायरने ज्या मुलीशी लग्न केलं, भारतात त्या धर्माची लोकसंख्या फक्त 70 हजारावर; कोण आहे करुण नायरची पत्नी?
Karun Nair: करुण नायरने आयपीएलमध्ये पुनरागमन केल्यानंतर पुन्हा एकदा त्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
karun nair ipl 2025
1/10

Karun Nair: मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 12 धावांनी पराभव केला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 205 धावा केल्या. प्रत्युत्तरात, संपूर्ण दिल्ली संघ फक्त 193 धावा करू शकला. आयपीएल 2025 मध्ये दिल्लीचा हा पहिला पराभव आहे, याआधी दिल्लीने सलग 4 विजय मिळवले होते.
2/10

दिल्लीकडून करुण नायरने 40 चेंडूत 89 धावांची शानदार खेळी केली. दरम्यानच्या काळात त्याचा फॉर्म चांगला नसल्यानं 2022 नंतरच्या हंगामात त्याला स्थान मिळालं नाही. कर्नाटकनं रणजीच्या संघात देखील स्थान दिलं नाही. यानंतर करुण नायरनं विदर्भ क्रिकेट असोसिएशनकडून खेळण्याचा निर्णय घेतला. विदर्भाला त्यानं रणजीचं विजेतेपद मिळवून दिलं. या कामगिरीच्या जोरावर करुण नायरसाठी आयपीएलचे दरवाजे पुन्हा उघडले. तब्बल 1076 दिवसांनी करुण नायरने पुनरागमन केले आणि मुंबई इंडियन्सविरुद्ध महत्वाची खेळी केली. मात्र त्याला संघाला विजयापर्यंत घेऊन जाता आले नाही. दिल्लीच्या पराभवानंतर करुण नायर खूप निराश झालेला दिसला.
Published at : 14 Apr 2025 03:07 PM (IST)
आणखी पाहा
























