एक्स्प्लोर
Ayush Mhatre CSK IPL 2025: ऋतुराजच्या जागी आयुष म्हात्रे खेळणार; कर्णधाराला 18 कोटी देणाऱ्या चेन्नईकडून 17 वर्षांच्या खेळाडूला किती रुपये मिळणार?
Ayush Mhatre CSK IPL 2025: ऋतुराज गायकवाडच्या जागी पृथ्वी शॉच्या नावाची देखील चर्चा रंगली होती. मात्र ऋतुराज गायकवाडच्या जागी 17 वर्षांच्या आयुष म्हात्रेला चेन्नईकडून संधी देण्यात आली आहे.
Ayush Mhatre CSK
1/8

Ayush Mhatre CSK: ऋतुराज गायकवाडच्या कोपराला झालेल्या दुखापतीमुळं आयपीएलच्या उर्वरित मोसमातून त्याला माघार घ्यावी लागली आहे. त्यानंतर चेन्नईने 17 वर्षांच्या मराठमोळ्या क्रिकेटरला संधी दिली आहे.
2/8

चेन्नई सुपर किंग्सने ऋतुराज गायकवाड याच्या जागी आयुष म्हात्रेचा संघात समावेश केला आहे. कोपराच्या फ्रॅक्चरमुळे कर्णधार गायकवाड संपूर्ण आयपीएलच्या स्पर्धेतून बाहेर पडला होता, त्यानंतर एमएस धोनी संघाचे नेतृत्व करत आहे.
3/8

चेन्नईकडून काही दिवसांपूर्वी काही तरुण खेळाडूंच्या चाचण्या घेतल्या, त्यानंतर संघाने मुंबईचा तरुण सलामीवीर फलंदाज म्हात्रेला संघात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला.
4/8

दरम्यान, ऋतुराज गायकवाडच्या जागी पृथ्वी शॉच्या नावाची देखील चर्चा रंगली होती. मात्र ऋतुराज गायकवाडच्या जागी 17 वर्षांच्या मराठी खेळाडूला चेन्नईकडून संधी देण्यात आली आहे.
5/8

आयुष म्हात्रे येत्या काही दिवसांत चेन्नईच्या संघात सामील होईल. चेन्नईकडून त्याला तातडीने सामील होण्यास सांगितले आहे.
6/8

आयुष म्हात्रे हा मूळचा मुंबईजवळ असणाऱ्या विरारचा रहिवाशी आहे.
7/8

आयपीएल लिलावात म्हात्रेची मूळ किंमत 30 लाख रुपये होती, परंतु त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नव्हते. त्यामुळे आता आयुष म्हात्रेला 30 लाख रुपये मिळणार आहे. दरम्यान ऋतुराज गायकवाडला चेन्नईने 18 कोटी रुपयांना संघात कायम ठेवले होते.
8/8

आयुष म्हात्रेने 9 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये खेळलेल्या 16 डावांमध्ये 504 धावा केल्या आहेत, आयुष म्हात्रेची सर्वोच्च धावसंख्या 176 धावा आहे. आयुष म्हात्रेने यामध्ये 2 शतके आणि 1 अर्धशतक झळकावले आहे. लिस्ट एमध्ये त्याने 7 डावात 458 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने 2 शतके आणि 1 अर्धशतक झळकावले आहे.
Published at : 14 Apr 2025 12:04 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























