गेल्या अनेक महिन्यांपासून या डब्याला हॉटेलमध्ये रूपांतरित करण्यासाठी काम सुरू होते. अखेर हे काम आता पूर्ण झाले असून येत्या एक ते दोन दिवसात या हॉटेलचे उद्घाटन रेल्वेचे जनरल मॅनेजर यांच्या हस्ते करण्यात येईल. हे हॉटेल सीएसएमटी स्थानकाच्या 18 नंबर प्लॅटफॉर्म समोर सुरू करण्यात येत असून येथे बाजूलाच भारतीय रेल्वेचा इतिहास सांगणारे अनेक जुने इंजिन, जुने डबे आणि वेगवेगळ्या जुन्या मशीन ठेवण्यात आल्या आहेत.
5/7
पी डिमेलो रोडच्या बाजूलाच हे हॉटेल असल्याने येण्या जाण्यास देखील सोयीस्कर आहे. तसेच या हॉटेलमध्ये जाण्यासाठी रेल्वेची टिकीट असणे किंवा प्लॅटफॉर्म तिकीट असणे बंधनकारक नाही. त्यामुळे आपल्या रेल्वेची वाट बघत असलेल्या प्रवाशांसोबत बाहेरील नागरिक देखील या हॉटेलमध्ये जाऊन वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात. एकूण चाळीस ग्राहकांची आसन क्षमता या हॉटेलमध्ये आहे. रेल्वेच्या डब्यात सुरू करण्यात आलेल्या या हॉटेलमध्ये दोन विभाग आहेत.
6/7
एका विभागात आपण बसून ऑर्डर देऊन जेऊ शकतो, तर दुसरीकडे उभ्याउभ्या वडापाव, सॅंडविच, ज्यूस, सॉफ्टड्रिंक असे पदार्थ खाऊ शकतो. अशा प्रकारचे रेल्वे डब्यात सुरु झालेले हॉटेल आसनसोल स्थानकात आहे. त्याच धर्तीवर मध्य रल्वेच्या सीएसएमटी स्थानकात दुसरे हॉटेल सुरू करण्यात येत आहे. या हॉटेल मध्ये आपल्याला वडापाव पासून ते पंजाबी, चायनीज आणि दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ खाता येणार आहेत.
7/7
हॉटेलच्या बाजुला रेल्वे स्थानकातच मोकळी जागा असल्याने पार्किंगची समस्या देखील इथे उद्भवणार नाही. रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार या हॉटेलपासून मध्य रेल्वेला येत्या काही वर्षात 40 लाखांपर्यंत उत्पन्न प्राप्त होईल. रेल्वे डब्यात सुरू करण्यात आलेल्या या हॉटेलला ग्राहकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे बघणे देखील महत्त्वाचे असणार आहे. या हॉटेलचा एक्सक्लुझिव्ह फर्स्ट लुक