एक्स्प्लोर
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी एल्गार; मनोज जरांगेंना आझाद मैदानात कोण कोण भेटलं?
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे यांनी आज सकाळी 10 वाजल्यापासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषणास सुरुवात केली आहे. दरम्यान, मनोज जरांगेंना आझाद मैदानात आतापर्यंत कोण कोण भेटलं? हे जाणून घेऊ
Manoj Jarange Patil
1/4

मनोज जरांगे हे मोठ्या संख्येने आंदोलकांसह मुंबईत दाखल झाले आहेत आणि त्यांनी आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. जरांगे यांनी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचे सांगितले. ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. मराठा आणि कुणबी एकच आहेत हे सरकारने मान्य करावे असेही त्यांनी म्हटले. आंदोलकांनी शांतता राखावी, दगडफेक किंवा जाळपोळ करू नये असे आवाहन जरांगे यांनी केले.
2/4

अशातच बीडचे खासदार बजरंग सोनावणे, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माळशिरस येथील आमदार उत्तमराव जानकर आणि करमाळा येथील आमदार नारायणबाबा पाटील यांनी मनोज जरांगे यांना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.
3/4

image 2
4/4

image 3
Published at : 29 Aug 2025 02:08 PM (IST)
आणखी पाहा























