एक्स्प्लोर
Pandharpur News : पंढपुरात बंदची हाक, ठिकठिकाणी रास्ता रोको; जालन्यातील घटनेचे राज्यभरात पडसाद
Pandharpur News : मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आज पंढरपूर मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.

Pandharpur News
1/10

सध्या श्रावण महिना असल्याने हजारोंच्या संख्येने भाविक शहरात येत आहेत .
2/10

मात्र आजच्या बंदमध्ये सर्व बाजारपेठ सामील झाल्याने शहरातील दुकाने सकाळीपासूनच बंद असल्याचं चित्र आहे .
3/10

शहरात ठिकठिकाणी आंदोलक शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करताना दिसत आहेत .
4/10

वाखरी ग्रामपंचायतीने तर शासन आपल्या दारी या कार्यक्रमात या घटनेचा निषेध करण्याचा ठराव केला आहे .
5/10

रविवार सकाळपासूनच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक , डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक , सावरकर चौक , महात्मा फुले चौक , प्रदक्षिणा मर्द , मंदिर परिसर अशा महत्वाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे .
6/10

शहर आणि परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडला नसला तरी प्रशासनाने मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली आहे .
7/10

तालुक्यातील विविध मार्गावर रास्ता रोको सुरु असल्याने एसटी बस वाहतुकीवर देखील मोठा परिणाम झाला आहे .
8/10

जालन्यातील मराठा आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जचे पडसाद सध्या संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत.
9/10

पंढपुरात देखील या घटनेचे परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं.
10/10

तर पंढपुरात पोलीस प्रशासन सतर्क असल्याचं पाहायला मिळत आहे.
Published at : 03 Sep 2023 12:16 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
हिंगोली
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion