एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
In Pics | शारदीय नवरात्रीच्या पहिल्या माळेला रुक्मिणी मातेला पारंपारिक अलंकारांचा विशेष साज
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/07/44f5dcea29b6dd67c68d9f8c83051de3_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Pandharpur News,
1/7
![शारदीय नवरात्रीच्या पहिल्या माळेला आज रुक्मिणी मातेला पारंपरिक दागिन्यात मढविण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/07/788428549b55475634612b6b8deba5d1a242f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शारदीय नवरात्रीच्या पहिल्या माळेला आज रुक्मिणी मातेला पारंपरिक दागिन्यात मढविण्यात आले आहे.
2/7
![आज पहिल्या माळेला रुक्मिणी मातेला नखशिखांत सोन्याने मढविण्यात आले आहे यात सोन्याचा मुकुट, वाक्या जोड , तानवड जोड, तोडे जोड, जवेंच्या तीन माळा , हायकोल , पुतळ्याची माळ , मोहोरी माळ , बोरमाळ , जवमणी पदक , चिंचपेटी , कंबर पट्टा आणि सरी अशा पारंपरिक मौल्यवान सुवर्ण दागिन्याने मढविण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/07/509f59effac92b8cc6fd8fd0c59128788fd72.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज पहिल्या माळेला रुक्मिणी मातेला नखशिखांत सोन्याने मढविण्यात आले आहे यात सोन्याचा मुकुट, वाक्या जोड , तानवड जोड, तोडे जोड, जवेंच्या तीन माळा , हायकोल , पुतळ्याची माळ , मोहोरी माळ , बोरमाळ , जवमणी पदक , चिंचपेटी , कंबर पट्टा आणि सरी अशा पारंपरिक मौल्यवान सुवर्ण दागिन्याने मढविण्यात आले आहे.
3/7
![विठुरायालाही नवरात्रीनिमित्त खास ठेवणीतील अलंकार घालण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/07/db13a14988a37f336dad1ef3f10472cd7d4c9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विठुरायालाही नवरात्रीनिमित्त खास ठेवणीतील अलंकार घालण्यात आले आहे.
4/7
![यात मस्तकी सोन्याचा मुकुट , कंठी कौस्तुभ मणी, कपाळी निळाचा नाम, मोत्याचा तुरा , दंड पेट्या , हिऱ्याचे कंगन, गळ्यात सात मोत्यांच्या कंठ्या , कानाला मत्स्य जोड, पायात तोडे , सोन्याच्या तुळशीची माळ, शाळीग्राम हार , मारवाडी करदोडा आणि सोन्याचे पितांबर असे अलंकार घालण्यात आले आहेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/07/9c874bc515e67d623e6c927a9d0ae2c6f6d77.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यात मस्तकी सोन्याचा मुकुट , कंठी कौस्तुभ मणी, कपाळी निळाचा नाम, मोत्याचा तुरा , दंड पेट्या , हिऱ्याचे कंगन, गळ्यात सात मोत्यांच्या कंठ्या , कानाला मत्स्य जोड, पायात तोडे , सोन्याच्या तुळशीची माळ, शाळीग्राम हार , मारवाडी करदोडा आणि सोन्याचे पितांबर असे अलंकार घालण्यात आले आहेत
5/7
![अनेक महिन्यांनंतर राज्यभरातून आलेल्या भाविकांना विठ्ठल रुक्मिणी मातेचे हे सोन्याने मढलेले रूप पाहण्याची संधी आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/07/b8e36de08c9d9a82ab35c0f631225db844009.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेक महिन्यांनंतर राज्यभरातून आलेल्या भाविकांना विठ्ठल रुक्मिणी मातेचे हे सोन्याने मढलेले रूप पाहण्याची संधी आली आहे.
6/7
![आता रोज नऊ दिवस रुक्मिणी मातेला विविध रूपात सजविण्यात येणार असून यावेळी विठुराया देखील रोज नवीन रूपात भाविकांना दिसणार आहे .](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/07/0a8cac31af5b81455abea001751059b219bfc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता रोज नऊ दिवस रुक्मिणी मातेला विविध रूपात सजविण्यात येणार असून यावेळी विठुराया देखील रोज नवीन रूपात भाविकांना दिसणार आहे .
7/7
![नवरात्रीचा पहिला दिवस आणि आजच्याच मुहूर्तावर राज्यभरातल्या मंदिरांची दारं उघडली आहेत. त्यामुळे देवाच्या दर्शनाचा सोहळा याची देही याची डोळा भाविकांना आता अनुभवता येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/07/f3bc6e43b533c01f1d49260e06c237853b6bf.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नवरात्रीचा पहिला दिवस आणि आजच्याच मुहूर्तावर राज्यभरातल्या मंदिरांची दारं उघडली आहेत. त्यामुळे देवाच्या दर्शनाचा सोहळा याची देही याची डोळा भाविकांना आता अनुभवता येणार आहे.
Published at : 07 Oct 2021 08:48 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)