एक्स्प्लोर
Ambabai Mandir Kolhapur : अंबाबाई मंदिरात दोन कोटींचे दान; कमी कालावधीत देवीसाठी भाविकांकडून भरभरून दान
Ambabai Mandir Kolhapur : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्र आणि दिवाळी दरम्यान अर्पण केलेल्या दानाची मोजणी पूर्ण झाली. मंदिराच्या 12 दानपेट्यांमध्ये 2 कोटींहून अधिक रक्कम दान करण्यात आली.
Ambabai Mandir Kolhapur
1/10

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्र आणि दिवाळी दरम्यान अर्पण केलेल्या दानाची मोजणी पूर्ण झाली आहे.
2/10

मंदिराच्या 12 दानपेट्यांमध्ये 2 कोटींहून अधिक रक्कम दान करण्यात आली.
3/10

इतक्या कमी कालावधीत भाविकांनी दिलेली ही सर्वाधिक रक्कम आहे.
4/10

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे म्हणाले, “कोविडनंतर पहिल्यांदाच मंदिर नवरात्र आणि दिवाळी दरम्यान भाविकांसाठी खुले होते आणि 25 लाखांहून अधिक भाविकांनी मंदिराला भेट दिली.
5/10

मंदिरातील सर्व 12 दानपेट्या भरल्यानंतर त्याची मोजणी करण्यात आली.
6/10

गरुड मंडप परिसरात देवस्थान समिती अधिकारी, 50 सुरक्षा रक्षक आणि देवस्थान आणि बँक कर्मचारी यांच्या उपस्थितीत मोजणी प्रक्रिया पार पडली.
7/10

ही संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली पार पडली
8/10

मंदिरात यंदा सलग दोन दिवस किरणोत्सव यशस्वी पार पडला.
9/10

दोन्ही दिवशी मावळतीची किरणे देवीच्या रुपावर पडली.
10/10

तिसऱ्या दिवशी ढगाळ वातावरणामुळे किरणोत्सव होऊ शकला नव्हता.
Published at : 16 Nov 2022 11:33 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र























