एक्स्प्लोर
Weather : राज्यात पावसासह गारपीटीची शक्यता, द्राक्ष उत्पादक चिंतेत
आजपासून सहा मार्चपर्यंत राज्याच्या काही भागात पावसाची (Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Maharashtra Weather
1/9

राज्यातील वातावरणात सातत्याने बदल (Climate change) होत आहेत. हवामान विभागानं (India Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार आजपासून सहा मार्चपर्यंत राज्याच्या काही भागात पावसाची (Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे
2/9

सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम चालू आहे. अशातच पाऊस जर झाला तर द्राक्ष उत्पादक (Grape Farmers) शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.
3/9

फळघडाचे नुकसान होऊन फंगसचे आक्रमण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पावसाचा इतर पिकांनाही फटका बसण्याची शक्यता आहे.
4/9

पाऊस किती होतो, त्यापेक्षा पाऊस कशा पद्धतीचा होतो, यावर शेतीपिकांचे नुकसान अवलंबून आहे.
5/9

पावसाबरोबर तूरळक ठिकाणी कदाचित गारपीट होण्याचीही शक्यता नाकारता येत नसल्याचे माणिकराव खुळे म्हणाले. पाऊस जरी 2 ते 10 मिमी असला तरी त्याचबरोबर वाराही ताशी 20 ते 25 किमी वेगाचा असु शकतो.
6/9

वाराच कदाचित जास्त फळबागा आणि रब्बी पिकांचे नुकसान करण्याची शक्यता आहे. त्यामुळं पावसापेक्षा ज्याला आपण वावधन म्हणतो त्या वाऱ्याचीच भिती एकंदरीत जास्त जाणवत असल्याचे खुळे म्हणाले.
7/9

विदर्भात सहा मार्च रोजी सर्वत्रच पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पाच मार्च रोजी नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाण्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
8/9

उत्तर कोकणात देखील पावसाची शक्यता कायम आहे. मात्र, अतिशय तुरळक पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून व्यक्त करण्यात आला आहे.
9/9

औरंगाबादेत देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Published at : 04 Mar 2023 08:09 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















