एक्स्प्लोर

Syrup Death Case: विषारी खोकला सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाच्या अखेर चेन्नईतून मुसक्या आवळल्या; आतापर्यंत औषधामुळे 24 लेकरांनी जीव सोडला

मध्य प्रदेशातील खोकला सिरप प्रकरणात 24 चिमुकल्यांचा मृत्यू; श्रीसन फार्माचे संचालक गोविंदन रंगनाथन अटकेत. तामिळनाडू एसआयटीकडून छापा; “रेस्पीफ्रेश टीआर” सिरपवर महाराष्ट्रात बंदी.

 

Madhya Pradesh Cough Syrup Death Case: मध्य प्रदेशात चिमुकल्या लेकरांचे मृत्यूकांड घडवण्यासाठी (Madhya Pradesh Cough Syrup Death Case) जबाबदार असलेल्या सर्दी कमी करणारे खोकला सिरप बनवणारी कंपनी श्रीसन फार्माचे संचालक गोविंदन रंगनाथनच्या (Govindan Ranganathan Arrested) मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) बुधवारी रात्री तामिळनाडूतील चेन्नईत छापा टाकत रंगनाथनच्या मुसक्या आवळल्या. एसआयटीने कंपनीकडून महत्त्वाची कागदपत्रे, औषधांचे नमुने आणि उत्पादन रेकॉर्ड देखील जप्त केले आहेत. रंगनाथन पत्नीसह फरार झाला होता. चेन्नईमध्ये, चेन्नई-बेंगळुरू महामार्गावरील रंगनाथनचे 2000 चौरस फूट क्षेत्रफळाचे अपार्टमेंट सील करण्यात आले, तर कोडंबक्कममधील नोंदणीकृत कार्यालय बंद आढळले.

 

दरम्यान, खोकला सिरप प्राशन केल्यानंतर मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या मुलांची संख्या 24 वर पोहोचली आहे. छिंदवाडाच्या उमरेठ तहसीलमधील पचधर गावातील रहिवासी असलेल्या तीन वर्षीय मयंक सूर्यवंशीचा बुधवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. 25 सप्टेंबरपासून त्याला नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते.

रासायनिक खरेदीसाठी कोणतेही बिल किंवा नोंद नाही (Coldriff Syrup Tragedy) 

दरम्यान, कोल्ड्रिफ सिरपच्या चौकशीतून एक मोठा खुलासा समोर आला आहे. तामिळनाडूच्या ड्रग्ज कंट्रोल डायरेक्टरच्या अहवालात हे सिरप नॉन-फार्मास्युटिकल ग्रेड केमिकल्सपासून बनवल्याचे उघड झाले आहे. तपासणीदरम्यान, कंपनीच्या मालकाने तोंडी कबूल केले की त्याने दोन हप्त्यांमध्ये प्रोपीलीन ग्लायकॉलच्या 50 किलोच्या दोन पिशव्या खरेदी केल्या होत्या. याचा अर्थ कंपनीने 100 किलो विषारी केमिकल खरेदी केले होते. तपासादरम्यान कोणतेही बिल आढळले नाही आणि खरेदीच्या नोंदीही करण्यात आल्या नाहीत. चौकशीदरम्यान, तपास अधिकाऱ्यांना सांगण्यात आले की पेमेंट कधी रोखीने तर कधी जी-पे द्वारे करण्यात आले.

विषारी केमिकलचे प्रमाण 486 पट जास्त होते (Diethylene Glycol Poisoning)

औषध ​​कंपनीने निकृष्ट दर्जाचे प्रोपीलीन ग्लायकॉल खरेदी केले. त्याची कधीही चाचणी करण्यात आली नाही. धक्कादायक म्हणजे, कंपनीकडे खरेदीचे बिल किंवा वापरलेल्या केमिकल्सचे रेकॉर्ड नाही. प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये असेही आढळून आले की या सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकॉल (DEG) आणि इथिलीन ग्लायकॉल (EG) सारखी विषारी रसायने परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा 486 पट जास्त प्रमाणात होती. एका तज्ज्ञाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की हे प्रमाण केवळ मुलांसाठी घातक नाही तर हत्तीच्या आकाराच्या प्राण्यांच्या मूत्रपिंड आणि मेंदूलाही नुकसान पोहोचवू शकते.

हे रसायन मार्चमध्ये खरेदी करण्यात आले होते (Tamil Nadu Drug Control Investigation)

तपास अहवालानुसार, कंपनीने 25 मार्च 2025 रोजी चेन्नईतील सनराइज बायोटेककडून प्रोपीलीन ग्लायकॉल खरेदी केले होते. ते नॉन-फार्मास्युटिकल ग्रेडचे होते, म्हणजेच ते औषधे बनवण्यासाठी योग्य नव्हते. असे असूनही, कंपनीने त्याची शुद्धता तपासली नाही किंवा त्यात डायथिलीन ग्लायकॉल किंवा इथिलीन ग्लायकॉलचे प्रमाण तपासले नाही. तामिळनाडू ड्रग्ज कंट्रोल डिपार्टमेंटला असे आढळून आले की या निकृष्ट रसायनाचा वापर करून अनेक औषधे तयार केली जात होती. परिणामी, तपासणी पथकाने तपासणी दरम्यान आपली चौकशी सुरू ठेवली. त्यावेळी कंपनीकडे प्रोपीलीन ग्लायकॉलचा साठा नसल्याचे त्यांना आढळले. यामुळे कंपनीने रसायनाची जलद विल्हेवाट लावून कागदपत्रे लपवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय आणखी बळावला. तामिळनाडू ड्रग कंट्रोल अथॉरिटीने म्हटले आहे की, सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने ही तपासणी आवश्यक आहे, कारण नॉन-फार्मास्युटिकल-ग्रेड रसायनांचा वापर करून बनवलेली औषधे मुलांसाठी आणि प्रौढांसाठी घातक ठरू शकतात.

'रेस्पीफ्रेश टीआर' कफ सिरपच्या खरेदी, विक्री व वापरावर प्रतिबंध (RespiFresh TR Ban Maharashtra)

दुसरीकडे, आता कोल्ड्रिप कप सिरपनंतर महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने “रेस्पीफ्रेश टीआर” या कफ सिरपच्या खरेदी, विक्री व वापरवर प्रतिबंध लावला आहे. कारण यात डाय एथिलीन ग्लायकॉल (Diethylene Glycol, DEG) प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असल्याचा अहवाल पुढे आले आहे. या आधी गुजरात, तामिलनाडू,  तेलंगणा, उतराखंडच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने आधीच रेस्पीफ्रेश टीआर” कप सिरप वर प्रतिबंध केला आहे. बालकांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या सर्वच प्रकारच्या कप सिरपचे नमुने घेऊन अन्न व औषध प्रशासन विभागाकडून त्यांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.  सोबत औषध निर्मित कारखान्याला भेट देऊन कप सिरप निर्मितीला लागणाऱ्या रसायनाची तपासणीचे काम देखील  अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सुरु असल्याचे सहाय्यक आयुक्त मनीष चौधरी यांनी सांगितले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Marathi : मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
Jay Pawar Photo : जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Winter Session Nagpur : उद्यापासून हिवाळी अधिवेशन, तापलं वातावरण Special Report
Jain Muni Kabutarkhana : कबुतरामुळे बिघडलं धर्मकारण, राजकारण Special Report
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता का नाही? Special Report
Pune NCP : पुण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी अजितदादांसोबत जाणार का? Special Report
Smruti & Palash Marriage : स्मृती मानधना- पलाश मुच्छलचं लग्न का मोडलं? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Marathi : मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
Jay Pawar Photo : जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
Ayodhya Crime News: मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
Embed widget