दरवर्षी गुढीपाडवा स्वागत यात्रेच्या निमित्ताने डोंबिवली गणेश मंदिराच्या आवारात संस्कार भारतीच्या वतीने महारांगोळीचे आयोजन केले जाते.
2/6
संस्कार भारतीचे कलाकार स्वागत यात्रेचा मार्ग रांगोळ्यानि सजवतात तर गणेश मंदिराच्या आवारात महारांगोळी काढली जाते.
3/6
यंदाही त्याच उत्साहाने संस्कार भरतीच्या सदस्यांनी 30 बाय 45 आकाराची महारांगोळी साकारली आहे.
4/6
भारताच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून 75 कलाकारांच्या सहकार्याने ही रांगोळी साकारण्यात आली आहे.
5/6
250 किलो रंग वापरून हि कलाकृती साकारली गेली आहे. विशेष म्हणजे भारत मातेच्या सभोवती 75 उद्दिष्ट पूर्तीचे गोल रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आले आहेत.
6/6
चैत्र प्रतिपदेच्या आदल्या दिवशी आमवस्येला छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिनी तरुणाईत छात्र तेज निर्माण करण्यासाठी डोंबिवली गणेश मंदिर संस्थाच्या वतीने ढोल ताशे वाजवून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.