एक्स्प्लोर
In Pics : किल्ला नव्हे तर शिवप्रेमीचे हॉटेल!
आपला वारसा ,संस्कृती पुढील पिढीला समजावी म्हणून या शिवप्रेमीने उभारलेले 'येस राजवाडा' हे हॉटेल आहे.

Yes Rajwada Hotel In Belgaon
1/11

सध्या वेगवेगळ्या रचना असलेली हॉटेल पाहायला मिळतात. असंच एक हॉटेल बेळगावमध्ये आहे. बाहेरुन पाहिलं तर तुम्हाला तो किल्ला वाटेल. परंतु हा किल्ला नसून हॉटेल आहे, हे सांगितल्यावर काही क्षण विश्वास बसणार नाही.
2/11

हे हॉटेल एका शिवप्रेमीचं आहे. आपला वारसा ,संस्कृती पुढील पिढीला समजावी म्हणून या शिवप्रेमीने उभारलेले 'येस राजवाडा' हे हॉटेल आहे.
3/11

लक्ष्मीकांत पाटील म्हणजे अस्सल शिवप्रेमी व्यक्तिमत्त्व. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे त्यांचे दैवत. किल्ल्यासारखी तटबंदी, बुरुजावर उभारलेले मावळे पाहिले की आपण शिवकाळात जातो.
4/11

हॉटेलच्या भव्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला की एका बाजूला नजरेस पडते छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आणि दुसऱ्या बाजूला राजमाता जिजाऊ आणि शिवराय.
5/11

तिथून आत गेल्यावर अनेक किल्ल्यांची नावे असलेली भोजनाची दालने पाहिली की पाहणाऱ्यांचा उर अभिमानाने भरुन येतो.
6/11

हॉटेलमध्ये आल्यावर ग्राहकाला प्रथम शेंगा आणि गूळ दिले जाते. आजही ग्रामीण भागात आजही घरी आलेल्या व्यक्तीला शेंगा आणि गूळ देऊन स्वागत केले जाते. आपली परंपरा जपण्याचा हा एक प्रयत्न.
7/11

सिंधुदुर्ग, विशाळगड, पन्हाळा, सिंहगड,पारगड, प्रतापगड, रायगड, राजगड, तोरणा, शिवनेरी अशी भोजनाच्या दालनांची नावे आहेत.
8/11

भोजनाच्या दालनात लोड तक्के असून जेवणाचे ताट चौरंगावर ठेवले जाते. अस्सल भारतीय बैठक असून मांसाहारी आणि शाकाहारी भोजनाचा आस्वाद घेता येतो.
9/11

शाही थाळी हे येस राजवाडा हॉटेलचे वैशिष्ट्य. एका थाळीत दोन जण भरपेट जेवण करु शकतात. मटण, चिकनचे विविध प्रकार आणि सोबतीला तांबडा, पांढरा रस्सा आणि बरेच काही आहे.
10/11

विशेष म्हणजे हॉटेलचे कर्मचारी अगदी आग्रह करुन वाढतात. हॉटेलचे मालक लक्ष्मीकांत पाटील ग्राहकांशी संवाद साधून त्यांचा अभिप्राय जाणून घेतात.
11/11

बाहेर हॉटेलात जेवायला तर सगळे जण जातात मात्र पूर्ण शिवमय वातावरणात जेवणाची संधी मिळाली तर त्याचा आनंद कसा असतो हे अनुभवायला येस राजवाडाला भेट द्यायलाच पाहिजे.
Published at : 18 Nov 2022 03:27 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
भारत
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
