एक्स्प्लोर
In Pics : एका तिळाचे शंभर तुकडे, यवतमाळ जिल्ह्यातील पुसदच्या अभिषेक रुद्रवारची कामगिरी
Yavatmal
1/6

एक तीळ सात जणांनी वाटून खावा असा एक वाक्प्रचार आहे आणि हा छोटासा तीळ सर्वांनी तो कसा वाटून खावा हा प्रश्नच आहे याचं म्हणीचा विचार करीत आणि त्यातून प्रेरणा घेत पुसदच्या अभिषेक रुद्रवार या 23 वर्षीय तरुणाने एकाच तिळाचे ब्लेडच्या पात्याने 16 मिनिटे 20 सेकंदात चक्क शंभर तुकडे केले आणि त्यांना क्रमांकही दिले त्याच्या या अभिनव कृतीची दखल घेत 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद करण्यात आली.
2/6

पुसद शहरातील विटावा वॉर्डातील अभिषेक सध्या नांदेड येथील एमजीएम कॉलेज मध्ये बीएफए बॅचलर ऑफ फाईन आर्ट अंतिम वर्षाला शिकत आहे. मुळात तो कलावंत आहे. मायक्रो आर्ट हा त्याच्या आवडीचा विषय आहे. त्याने आतापर्यंत मोहरी, तांदूळ, सुपारी, खडू, पेन्सिल, माचीसची काडी यावर गणपतीचे चित्र रेखाटले आहे.
3/6

तिळावर चक्क त्याने ABCD यासारखे इंग्रजी मुळाक्षरे तर 1 ते 10 पर्यंतचे अंक लिहिले आहेत. तसेच पेन्सिलच्या टोकावर त्याच्या सूक्ष्म कलेतून माहूरची रेणुका, कोल्हापूरची देवी साकारली आहे.
4/6

तिळाचे एवढे सुक्ष्म तुकडे आपण उघड्या डोळ्याने सहजतेने पाहू शकतो मागील चार पाच वर्षापासून सुक्ष्म कला त्यांनी जपली आहे त्याच्या कलेचे अनेक कंगोरे आहेत.
5/6

वाळलेल्या पानांवर कटिंग करून गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे चेहरे साकार करणे,एक रूपयाच्या नाण्यावर विविधरंगी निसर्ग चित्र रेखाटणे,आपट्याच्या पानावर सुरेख निसर्गरंग भरणे असा कलात्मक छंद अभिषेकने जोपासला आहे.
6/6

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्यानंतर आता त्याला गिनीज बुक मध्ये विक्रमाची नोंद करावयाची आहे.त्या दृष्टीने त्याची तयारी सुरू आहे.
Published at : 09 Jan 2022 12:02 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
























