एक्स्प्लोर
PHOTO : 'लोकबिरादरी'चं भन्नाट काम, अनोखा उपक्रम राबवत पाण्याचा प्रवाह मोकळा केला
न्िनिन
1/6

गडचिरोली : आलापल्ली ते भामरागड काम याच विभागाचे असले तरी या मार्गावरील कुमरगुडा आणि ताडगावजवळच्या नाल्यांवर रपट्याखाली जंगलातून पावसामुळे वाहत येणाऱ्या लाकडांचा कचरा साचतो.
2/6

परिणामी पाणी अडून रपट्यांखालील पाईपजवळ अडलेली रपट्यावरून पाणी वाहते. ही समस्या दूर करण्यासाठी डॉ प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांनी श्रमदान करून अडकलेली लाकडं, कचरा साफ करत पाण्याचा प्रवाह मोकळा केला.
3/6

राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अखत्यारित असलेल्या या मार्गाची पुनर्बांधणी होणे बाकी आहे. या मार्गावरील पूलही उंच आणि मोठे करावे लागणार आहेत.
4/6

पण तोपर्यंत येणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्याचे काम याच विभागाचे असले तरी त्याकडे कोणाचेही लक्ष नसते.
5/6

लोकबिरादरी प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांनी अनिकेत आमटे यांच्या मार्गदर्शनात दोन्ही ठिकाणच्या रपट्यांखालील पाईपजवळ अडलेली छोटी-मोठी लाकडे काढली.
6/6

हा कचरा साफ करण्याचे काम दरवर्षी संबंधित विभागाने करणे अपेक्षित आहे. पण, ते करत नसल्यामुळे थोडा पाऊस झाला तरी पाणी अडून ते पुलावरून वाहते आणि रहदारी बंद होते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी स्वत:हून कचरा काढण्याचे काम केल्याचे अनिकेत आमटे यांनी सांगितले.
Published at : 20 Sep 2021 11:12 AM (IST)
आणखी पाहा























