एक्स्प्लोर
Rakshabandhan 2022 : केळाच्या खोडापासून राष्ट्रध्वजाच्या रंगाच्या पर्यावरण पूरक राख्या
पालघरमधील महिला बचत गटाने तयार केलेल्या तिरंगा रंगाच्या राख्या पोहचणार सैनिकांपर्यंत
rakshabandhan 2022
1/8

पालघरमधील वाडा तालुक्यातील तुसे या गावातील महिला बचत गटाने पर्यावरण पोषक असणाऱ्या केळीच्या खोडापासून म्हणजे बनाना फायबर पासून राष्ट्रद्वजाच्या रंगाच्या राख्या तयार केल्या आहेत.
2/8

विशेष म्हणजे या सर्व राख्या देशाच्या वेगवेगळ्या सीमा भागात रक्षण करणाऱ्या सैनिकांपर्यंत पोहचवल्या जाणार आहेत.
3/8

आझादी का अमृत महोत्सवाचे औचित्य साधत पालघर मधील वाडा तुसे येथील समर्थ ग्रामसंघांतर्गत तयार करण्यात आलेल्या बचत गटाकडून हा अनोखा उपक्रम केला जातो
4/8

आतापर्यंत या बचत गटाला सत्तर हजार राख्यांची ऑर्डर मिळाली आहे.
5/8

केळीच्या खोडापासून म्हणजे बनाना फायबर पासून अत्यंत बारीक काम करून या सुबक राख्या तयार करण्यात आल्या आहेत.
6/8

या राख्यांना दिलेल्या तिरंग्याच्या रंगामुळे या राख्या आणखी आकर्षक झाल्या आहेत.
7/8

बनाना फायबरपासून तयार केल्या जाणाऱ्या या राख्यांना बनवण्यासाठी जवळपास 50 रुपये इतका खर्च येत आहे.
8/8

या राख्या मुंबई - ठाणे शहरातही आता उपलब्ध होणार आहेत. शिवाय स्वयंरोजगारावर उभ्या राहू पाहणाऱ्या महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार देखील उपलब्ध होतोय.
Published at : 07 Aug 2022 09:01 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























