एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Ambedkar Jayanti 2023 : डॉ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध कलाकृतीच्या माध्यमातून अभिवादन!
Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
Ambedkar Jayanti 2023
1/11

परभणीत साकारली डॉ. आंबेडकर यांची 55 हजार चौरस फुटांची भव्य रांगोळी!
2/11

सुमन दाभोळकर यांनी स्टोन आर्ट च्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं
3/11

रविराज चिपकर यांनी हे वाळूशिल्प साकारल आहे. वाळूवर रंगांची उधळण करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं सुंदर असं वाळूशिल्प साकारल आहे
4/11

रंगीत रांगोळीचा वापर करून विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना रांगोळीच्या माध्यमातून साकारत मानवंदना दिली आहे.
5/11

देवगड तालुक्यातील वाडा गावातील युवा चित्रकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा व्यक्तिचित्र साकारला आहे. हे व्यक्तिचित्र साकारण्यासाठी त्यांनी तारीच्या जाळीचा वापर करून त्यावर लोकरीच्या धाग्याच्या सहाय्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तिचित्र साकारला आहे. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखी मानवंदना व्यक्तीचित्रातून सिध्दार्थ वाडेकर यांनी दिली आहे.
6/11

परभणीच्या जिंतूर तालुक्यातील प्रमोद उबाळे या तरुण कलाकाराने खडूवर डॉ बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा साकारली
7/11

राज्यभरात आंबेडकर जयंतीचा उत्साह असताना हिंगोली ते हा उत्साह कायम दिसला आज हिंगोली शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अनेक विद्यार्थ्यांनी लेझीम खेळत मानवंदना दिली या विद्यार्थ्यासोबत शिवसेनेचे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी सुद्धा लेझीम खेळत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली आहे
8/11

पिंपरी चिंचवडमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. आंबेडकर विचारवंतांनी एकत्र येत पवना नदीत स्वच्छता मोहीम राबवली. शहरातून वाहणारी ही नदी नेहमीच प्रदूषित असते. म्हणून बाबासाहेबांना अभिवादन करतानाच पवना नदीला मोकळा श्वास देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी मद्याच्या रिकाम्या बाटल्या, जैव वैद्यकीय कचरा, तसेच आरोग्यास हानीकारक ठरणाऱ्या वस्तू नदी पात्रात आढळून आला. पवना जलमित्र ग्रुपने हा अभिनव उपक्रम राबविला, ज्याला अनेक आंबेडकर विचारवंतांनी हातभार लावला.
9/11

देवगड तालुक्यातील वाडा गावातील युवा चित्रकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा व्यक्तिचित्र साकारला आहे.
10/11

तब्बल पाच तास मेहनत घेत साकारली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची रांगोळी. नांदगावच्या ममता आहेर या विद्यार्थिनीने जयंतीनिमित्त केले अनोखे अभिवादन
11/11

महामानवाला अनोखी मानवंदना, एक रुपयावर साकारलं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच चिञ
Published at : 14 Apr 2023 02:56 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















