एक्स्प्लोर
Mahashivratri: दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कुणकेश्वर मंदिरात देवगड हापुसची आरास!
kunkeshwar
1/14

दक्षिण कोकणची काशी अशी संपूर्ण कोकणासह राज्यात ख्याती असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर मंदिर.
2/14

हे पांडवकालीन कुणकेश्वर मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड मधील समुद्र किनारी वसलेलं आहे.
3/14

कुणकेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने यात्रा उत्सवाला सुरवात झाली आहे.
4/14

महाशिवरात्रीच्या काळात कुणकेश्वर येथे तीन दिवस जत्रा भरते.
5/14

आठ ते दहा लाख भक्तांची मांदियाळी याठिकाणी पाहायला मिळते.
6/14

काशी येथे 108 शिवलिंगे आहेत तर कुणकेश्वर येथे 107 शिवलिंगे आहेत.
7/14

मात्र हि शिवलिंगे समुदाच्या काठावर असल्यामुळे ही ओहोटीच्या वेळीच पाहायला मिळतात.
8/14

या मंदिराच्या मागे असलेल्या शिवलिंगांमुळेच या स्थानाला कोकणची काशी असे संबोधले जाते.
9/14

कुणकेश्वराचे स्थान इ.स. 11 व्या शतकापूर्वी पासून प्रसिद्धी आहे.
10/14

350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्यक्ष कुणकेश्वर मंदिरातही येऊन गेल्याची माहिती स्थानिक सांगतात.
11/14

कुणकेश्वर मंदिराचा परिसर आकर्षक फुलांनी सजविला आहे. तसेच शंकराची पिंडीही फुलांनी सजविली आहे.
12/14

आकर्षक विद्युत रोषणाईने कुणकेश्वर मंदिर परिसर सजून गेला आहे.
13/14

जगप्रसिद्ध देवगड हापुसची आरास देखील यावेळी कुणकेश्वर मंदिरात करण्यात आली.
14/14

रात्रीपासून मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी मंदिर परिसर आहे.
Published at : 01 Mar 2022 03:47 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
धाराशिव
महाराष्ट्र
भारत























