एक्स्प्लोर
PHOTO : यळकोट यळकोट जय मल्हार! चंपाषष्ठीला खंडेरायाची जेजुरी सजली, डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य
jejuri,khandoba,Champashashthi
1/8

अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्या तीर्थक्षेत्र जेजूरी नगरीत आजपासून चंपाषष्टी षडरात्रोत्सव प्रारंभ झाला.
2/8

जेजूरी गडकोटात उत्सवमूर्तींना करविर पीठाचे शंकराचार्यांच्या हस्ते विधिवत पूजा अभिषेक करून उत्साहात व धार्मिक वातावरणात बालदारीत घट स्थापना करण्यात येते. सहा दिवस जेजुरीत षडरात्रोत्सव साजरा होत असतो.
3/8

पौराणिक काळात ऋषी मुनींना त्रास देणार्या मणी व मल्ल दैत्यांचा संहार करण्यासाठी महादेवाने मल्हारी मार्तंडाचा अवतार धरण करून चंपाषष्ठीच्या दिवशी दैत्यांचा वध करून विजय मिळवला.
4/8

हे युद्ध मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्ठीपर्यंत ६ दिवस चालले होते. तेव्हापासून या सहा दिवसात खंडोबा गडावर विजयोत्सव साजरा केला जातो. चंपाषष्ठी हा दिवस विजय दिन म्हणून ही साजरा केला जातो.
5/8

उत्सवाचा प्रारंभ करताना आज पहाटेच मुख्य मंदीरात पाकाळणी करण्यात येते. मार्तंड भैरव मूर्तीला दही दूध व तेलाने स्नान घालण्यात आले.
6/8

सभोवताली गाभार्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात येत असते.
7/8

महापूजा उरकल्यानंतर श्री खंडोबा व म्हाळसा देवीच्या उत्सव मूर्तींना मिरवणुकीने मंदीर प्रदक्षिणा घातली जाते. मंगलमय वातावरणात तेथे उत्सवमूर्तीची स्थापना करून समोर घट बसवण्यात येतात.
8/8

प्रतिष्ठानच्यावतीने संपूर्ण गडकोटाला रोषणाई करण्यात आली आहे, गाभार्यात व मंदिराला आकर्षक फुलांची सजावट केली आहे.
Published at : 09 Dec 2021 03:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
