एक्स्प्लोर

Buldhana Accident : मध्यरात्री अपघात, 25 जणांचा होरपळून मृत्यू, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून घटनास्थळाची पाहणी

बुलढाण्यामध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) बुलढाणा येथे बसचा अपघात होऊन 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Buldhana

1/7
महाराष्ट्राची (Maharashtra News) आजची सकाळ अत्यंत दुःखद बातमीनं झाली. नागपूरहून (Nagpur) पुण्याला (Pune) जाणाऱ्या एका खाजगी बसला भीषण अपघात (Accident News) झाला. या बसमध्ये अंदाजे 33 प्रवासी होते.  अपघातात 25 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 8 प्रवासी सुखरुप असल्याचं कळतंय. (PTI)

2/7
बसचा हा भीषण अपघात बुलढाणाजवळच्या सिंदखेडराजाजवळील पिंपळखुटा गावाजवळ झाला आहे. नागपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला. साधारणतः मध्यरात्री 1.30 वाजता हा अपघात झाला. बस सर्वात आधी लोखंडी पोलला धडकली त्यानंतर काही अंतरावर जाऊन बस पलटी झाली आणि बसनं अचानक पेट घेतला, अशी अपघाताबाबत प्राथमिक माहिती मिळत आहे. (PTI)

3/7
अपघाताची माहिती मिळताच तात्काळ पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालं. बुलढाण्याचे पोलीस अधिक्षक सुनील कडासने देखील घटनास्थळी उपस्थित होते. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी अपघाताबाबत सविस्तर माहिती सांगितली. (PTI)

4/7
बुलढाणा पोलीस अधिक्षक सुनील कडासने यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनाग्रस्त बसमधून आतापर्यंत 25 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. 8 जण या अपघातातून सुखरुप बचावले आहेत. (PTI)

5/7
बुलढाणा जिल्ह्यात झालेली अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुख:द आहे. यामध्ये बसने पेट घेतल्यानं 25 जणांचा मृत्यू झाला आहे. आठ लोक जखमी आहेत. मी याबाबत जिल्ह्याधिकारी तेथील पोलिस अधिकारी यांच्याशी बोलत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर चांगले उपचार करण्याच्या सूचना मी दिल्या असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. जखमी रुग्णांचा खर्च राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून पाच लाखांची मदत दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. (PTI)

6/7
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताच्या ठिकाणी पाहणी केली.  (PTI)

7/7
अपघात झाल्यानंतर तात्काळ त्याठिकाणी यंत्रणा दाखल झाल्या होत्या. पण बसने मोठा पेट घेतल्यानं बसमधील प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. समृद्धी महामार्गावर प्रशासन योग्य त्या उपायोजना करत आहे. काही वेळेला वेगावर नियंत्रण नसल्यानेही अपघात होत आहेत. त्यामुळं वाहनचालकांनी देखील वाहन चालवताना काळजी घेणं गरजेचं असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.  (PTI)

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : अजितदादांची श्रीरामपूरमध्ये मोठी खेळी! जेलमध्ये असणाऱ्या माजी आमदाराच्या कुटुंबियांची घेतली अचानक भेट, पक्षाची ताकद वाढणार?
अजितदादांची श्रीरामपूरमध्ये मोठी खेळी! जेलमध्ये असणाऱ्या माजी आमदाराच्या कुटुंबियांची घेतली अचानक भेट, पक्षाची ताकद वाढणार?
Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिक पूर्वमध्ये राजकारण तापलं! 'माझ्याकडे निवडणुकीचा अजेंडा' राहुल ढिकलेंच्या वक्तव्यावर गणेश गीतेंचा हल्लाबोल, म्हणाले 'तुमचा अजेंडा...'
नाशिक पूर्वमध्ये राजकारण तापलं! 'माझ्याकडे निवडणुकीचा अजेंडा' राहुल ढिकलेंच्या वक्तव्यावर गणेश गीतेंचा हल्लाबोल, म्हणाले 'तुमचा अजेंडा...'
शिंदेंकडील 8 आमदार 1 मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंचा पलटवार; दिलं चॅलेंज

Maharashtra Election 2024: हरियाणात जे घडलं ते टाळायचं असेल तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करा, केजरीवालांच्या 'आप'ची मोठी मागणी
उद्धव ठाकरेंना आत्ताच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, अन्यथा... केजरीवालांच्या 'आप'ची मोठी मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narendra Modi Speech Chimur|मराठीतून भाषणाला सुरुवात, मविआ म्हणजे भ्रष्टाचाराची खिलाडी, मोदींची टीकाAaditya Thackeray Speech Georai | गद्दारांचा समाचार, राज्यातील प्रकल्पावरून मोदी-शाहांना सुनावलंEknath Shinde Amravati : त्यांना कायमचे बाहेर पाठवून द्या; शिंदेंची राणा दाम्पत्यावर जहरी टीकाSada Sarvankar BJP Support : माहिममध्ये भाजपकडून सदा सरवणकरांचा प्रचार #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : अजितदादांची श्रीरामपूरमध्ये मोठी खेळी! जेलमध्ये असणाऱ्या माजी आमदाराच्या कुटुंबियांची घेतली अचानक भेट, पक्षाची ताकद वाढणार?
अजितदादांची श्रीरामपूरमध्ये मोठी खेळी! जेलमध्ये असणाऱ्या माजी आमदाराच्या कुटुंबियांची घेतली अचानक भेट, पक्षाची ताकद वाढणार?
Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिक पूर्वमध्ये राजकारण तापलं! 'माझ्याकडे निवडणुकीचा अजेंडा' राहुल ढिकलेंच्या वक्तव्यावर गणेश गीतेंचा हल्लाबोल, म्हणाले 'तुमचा अजेंडा...'
नाशिक पूर्वमध्ये राजकारण तापलं! 'माझ्याकडे निवडणुकीचा अजेंडा' राहुल ढिकलेंच्या वक्तव्यावर गणेश गीतेंचा हल्लाबोल, म्हणाले 'तुमचा अजेंडा...'
शिंदेंकडील 8 आमदार 1 मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंचा पलटवार; दिलं चॅलेंज
शिंदेंकडील 8 आमदार 1 मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंचा पलटवार; दिलं चॅलेंज
Maharashtra Election 2024: हरियाणात जे घडलं ते टाळायचं असेल तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करा, केजरीवालांच्या 'आप'ची मोठी मागणी
उद्धव ठाकरेंना आत्ताच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, अन्यथा... केजरीवालांच्या 'आप'ची मोठी मागणी
नक्षलवादाला लगाम घालत या भागात आम्ही उद्योग आणले; चंद्रपुरात मोदींचं भाषण, काँग्रेस, मविआवर हल्लाबोल

Sharad Pawar: पंढरपूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचा काँग्रेस अन् भाजपला दणका! अमोल कोल्हेंच्या उपस्थितीत 10 नगरसेवकांनी फुंकली तुतारी
पंढरपूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचा काँग्रेस अन् भाजपला दणका! अमोल कोल्हेंच्या उपस्थितीत 10 नगरसेवकांनी फुंकली तुतारी
Rohit Pawar : उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्यानंतर रोहित पवार कडाडले; म्हणाले, महायुतीकडून जे चाललंय....
उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्यानंतर रोहित पवार कडाडले; म्हणाले, महायुतीकडून जे चाललंय....
Sharad Pawar : लोकसभेला 400 जागा कशासाठी? मोदींचा वेगळाच डाव होता; शरद पवारांचा हल्लाबोल, म्हणाले, मनमोहन सिंग यांचं सरकार...
लोकसभेला 400 जागा कशासाठी? मोदींचा वेगळाच डाव होता; शरद पवारांचा हल्लाबोल, म्हणाले, मनमोहन सिंग यांचं सरकार...
Embed widget