एक्स्प्लोर
Andheri Bypoll Result: अंधेरी पोटनिवडणुकीत विजय, शिवसैनिकांचा जल्लोष; पाहा 'मातोश्री'तील फोटो
मशाल भडकली, भगवा फडकला अशी प्रतिक्रिया ऋतुजा लटके यांच्या विजयानंतर उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. अंधेरी पोट निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी विजय मिळवला.
अंधेरी पोटनिवडणुकीत विजय, शिवसैनिकांचा जल्लोष; पाहा 'मातोश्री'तील फोटो
1/9

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाला.
2/9

या विजयानंतर ऋतुजा लटके, शिवसेना नेते अनिल परब यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांची भेट घेतली.
3/9

यावेळी स्थानिक शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
4/9

विजयी उमेदवार ऋतुजा लटके यांचे रश्मी उद्धव ठाकरे यांनी औक्षण केले आणि अभिनंदन केले.
5/9

मशाल भडकली, भगवा फडकला अशी प्रतिक्रिया ऋतुजा लटके यांच्या विजयानंतर उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
6/9

"जनता आमच्यासोबत आहे हे आजच्या निकालाने स्पष्ट केलं. ही आता सुरूवात झाली आहे. लढाईची सुरूवातच विजयाने झाली आहे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
7/9

अंधेरी पूर्व येथील आमदार रमेश लटके यांच्या निधनाने ही पोटनिवडणूक झाली.
8/9

शिवसेनेतील बंडखोरीनंतर ही निवडणूक झाली. या निवडणुकीत ठाकरे गटाला 'मशाल' हे चिन्ह मिळाले
9/9

उद्धव ठाकरे यांच्यासोबत विजयाचा आनंद साजरा करताना शिवसैनिकांचा उत्साह ओसांडून वाहत होता.
Published at : 06 Nov 2022 04:09 PM (IST)
आणखी पाहा






















