एक्स्प्लोर
Kolhapur Rain Update : कोल्हापुरात पावसाची उघडझाप; पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत इंचाइंचाने वाढ; आठ तासात तीन इंचांनी वाढ
गेल्या दोन दिवसांपासून स्थिर असलेल्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत इंचाइंचाने वाढ होत आहे. आज (27 जुलै) सकाळी नऊ वाजल्यापासून नदीच्या पाणी पातळीत 3 इंचानी वाढ झाली आहे.

Kolhapur Rain Update
1/12

गेल्या दोन दिवसांपासून स्थिर असलेल्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत इंचाइंचाने वाढ होत आहे.
2/12

आज (27 जुलै) सकाळी नऊ वाजल्यापासून नदीच्या पाणी पातळीत 3 इंचानी वाढ झाली आहे. दुसरीकडे, राधानगरी धरणातून 8540 क्युसेकने विसर्ग सुरु आहे.
3/12

आज (27 जुलै) सायंकाळी पाच वाजेपर्यंत 40 फुट 8 इंचावर पोहोचली आहे.
4/12

पंचगंगा इशारा पातळीवरून वाहत असून धोका पातळी 43 फुट आहे.
5/12

पंचगंगा नदीची पाणी पातळी 45 फुटांवर गेल्यास प्रशासनाने स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.
6/12

आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक पार पडली.
7/12

या बैठकीत तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याने दिलासा मिळाला आहे.
8/12

कोल्हापूरमधील शाळा उद्यापासून पूर्ववत होणार आहेत.
9/12

त्याचबरोबर पूरसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने स्थलांतरित करण्यात आलेल्या कुटुंबाना उद्या (28 जुलै) घरी परत पाठवलं जाणार आहे.
10/12

बालिंगा पुलावरून एकेरी वाहतूक सुरु करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
11/12

पंचगंगा नदीची पाणी पातळी एक-एक इंचाने वाढली आहे. नागरिकांनी गोंधळून जाऊ नये, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
12/12

जिल्ह्यात पावसाच्या दुर्घटनेत दोन बळी गेले असून त्यांना शासकीय मदत करणार असल्याचेही केसरकर म्हणाले.
Published at : 27 Jul 2023 05:48 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
