एक्स्प्लोर
कोल्हापूर : निगवे खालसात पूर्णाकृती शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण
Kolhapur news : निगवे खालसा (ता. करवीर) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आमदार ऋतुराज पाटीलही उपस्थित होते.

kolhapur news
1/10

निगवे खालसा (ता. करवीर) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते पार पडला.
2/10

यावेळी आमदार ऋतुराज पाटीलही उपस्थित होते.
3/10

यावेळी पाच कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या नवीन नळपाणी पुरवठा योजनेसह विविध विकासकामांचे उदघाटन यावेळी करण्यात आले.
4/10

आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी आणखी निधी देण्याची ग्वाही दिली.
5/10

आमदार सतेज पाटील यांनी शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य मला मिळाले, यासाठी नशीबवान समजतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
6/10

त्यांनी जे विचार दिले आहेत ते आपण जोपासले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले.
7/10

कार्यक्रमाला ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
8/10

आमदार म्हणून गावच्या विकासासाठी सर्वांगीण सहकार्य करण्याची ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली.
9/10

यावेळी माजी आमदार के. पी. पाटील, शशिकांत पाटील - चुयेकर, किसनराव चौगुले, प्रा. अर्जुन आबिटकर, प्रकाश पाटील, एकनाथ पाटील, निवास पाटील, श्रीपती पाटील, बचाराम किल्लेदार, सागर पाटील, एल.एच. किल्लेदार, सरपंच सौ. ज्योती दीपक कांबळे, उपसरपंच संभाजी किल्लेदार उपस्थित होते.
10/10

तसेच शिवप्रतिष्ठान पुतळा समितीचे अध्यक्ष पांडुरंग श्रीपती महाडेश्वर, ग्रामपंचायत सदस्य, शिवप्रतिष्ठान पुतळा समिती सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Published at : 23 Mar 2023 05:35 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
अकोला
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
