एक्स्प्लोर
Kolhapur Rain Update: कोल्हापूर, सातारा जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट, अतिमुसळधार पावसाची शक्यता
Kolhapur Rain Update: हवामान विभागाने कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यासाठी आज (23 जुलै) रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Kolhapur Rain Update
1/12

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाने जोर पकडल्याने पंचगंगा नदी इशारा पातळीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.
2/12

पंचगंगा नदीचे पाणी गायकवाड वाड्यापर्यंत आल्याने गंगावेश ते शिवाजी पूल मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
3/12

आज (23 जुलै) दुपारी तीनपर्यंत पंचगंगेची पाणी पातळी 38 फुट 2 इंचावर पोहोचली आहे.
4/12

पंचगंगा नदी इशारा पातळी 39 व धोका पातळी 43 फुट आहे. जिल्ह्यातील 82 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
5/12

हवामान विभागाने कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट दिला आहे.
6/12

दोन्ही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
7/12

कोल्हापुरात पंचगंगा नदी इशारा पातळीकडे गेल्याने जिल्हा प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे.
8/12

नदीकाठच्या गावातील लोकांना आता जिल्हा प्रशासनाबरोबरच ग्रामपंचायतकडूनही वेळीच स्थलांतरित होण्याचा सूचना दिल्या जात आहेत.
9/12

कोल्हापुरात महापुराचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या आंबेवाडी आणि चिखली गावात सध्या ग्रामपंचायतकडून स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
10/12

जिल्ह्यातील राधानगरी धरणात 6.78 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
11/12

राधानगरी धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरणात 81 टक्के पाणीसाठा झाला आहे.
12/12

धरणांच्या स्वयंचलित दरवाज्यांपर्यंत पाणी आल्याने ते लवकरच उघडण्याची शक्यता आहे.
Published at : 23 Jul 2023 04:31 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर























