एक्स्प्लोर
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांविरोधात गुन्हा दाखल होताच मुरगूड पोलिस ठाण्यासमोर प्रचंड घोषणाबाजी
आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात 40 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि त्यांचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहेत.
hasan mushrif
1/10

आमदार हसन मुश्रीफांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
2/10

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि त्यांच्या समर्थकांनी मुरगूड पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली.
3/10

यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
4/10

हसन मुश्रीफांविरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या विवेक कुलकर्णींविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे.
5/10

त्यामुळे तालुक्यामध्ये राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.
6/10

शेकडोंच्या संख्येने एकत्रित येत या कार्यकर्त्यांनी आज मुरगूड पोलिस ठाण्यासमोर मुश्रीफ यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.
7/10

वातावरण तणावपूर्ण होत चालल्याने पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली आहे.
8/10

तसेच या घटनेचा जाब विचारण्यात आला होता.
9/10

त्यामुळे आता मुश्रीफ आणि घाटगे या दोन्ही गटातील वाद दिवसागणिक वाढत चालला आहे.
10/10

काल (24 फेब्रुवारी) रात्रीही मुरगूड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांकडून ठिय्या मांडण्यात आला होता.
Published at : 25 Feb 2023 02:07 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आरोग्य
क्रिकेट
व्यापार-उद्योग
























