एक्स्प्लोर
Masai Plateau Kolhapur : मसाई पठारावर रंगबेरंगी फुलांची उधळण; असंख्य प्रकारची फुले बहरली
Masai Plateau Kolhapur : निसर्गाची रंगीबेरंगी दुनिया अनुभवण्यासाठी कोल्हापूरचे हे प्रति कास पठार नव्हे तर 'खास' पठार पाहण्यासाठी पर्यटकाबरोबर निसर्ग अभ्यासकांची पावले ही पठाराकडे वळत आहेत.

Masai Plateau Kolhapur
1/10

सातारा जिल्ह्यातील कास पठारावर फुललेल्या फुलांप्रमाणेच कोल्हापूर जिल्ह्यातील मसाई पठारावर देखील रंगबिरंगी फुल मोठ्या प्रमाणात फुलत असतात.
2/10

दरवर्षी सप्टेंबर महिन्यात कोल्हापुरात असणाऱ्या या पठाराकडे निसर्ग अभ्यासक आणि पर्यटकांची पावले वळू लागतात.
3/10

कारण हे पठार कोल्हापूरकरांसाठी 'खास' आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडाच्या शेजारीच असणारे मसाई पठार सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
4/10

निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली रंगीबेरंगी फुलांची उधळण केली आहे.
5/10

अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरी, दाट धुक्याची दुलई यामुळे पर्यटकांना हवी तशी आनंदपर्वणी आणि नेत्रसुख मिळत असल्याने पर्यटक मंडळी आधी पन्हाळा आणि नंतर मसाई पठार असा दोन्ही पर्याय निवडताना दिसताहेत.
6/10

मसाई पठारवर फुलांमध्ये ड्रॉसेरा, सोनकी, तेरडा, निलीमा यांसारखी असंख्य प्रकारची फुले फुलली आहेत.
7/10

तसेच दुर्मिळ औषधी वनस्पती याही याठिकाणी पाहायला मिळत आहेत. मसाई पठार जांभ्या खडकापासून बनले असल्याने काळया खडकावर फुलणारी भुईआमरीच्या सहा ते सात प्रजाती इथे आढळतात.
8/10

रानकोथिंबीर, सफेद मुसळी, नीलवंती , मंजिरी, सीतेची आसवे, केना, पेनवा यासारख्या विविध रंगाची, आकाराची, छोटीमोठी रानफुलेही पाहायला मिळतात.
9/10

मसाई पठारावर तलावांच्या काठावर पाणथळ परिसरातही मोठ्या संख्येने फुले फुलतात.
10/10

निसर्गाची ही रंगीबेरंगी दुनिया अनुभवण्यासाठी कोल्हापूरचे हे प्रति कास पठार नव्हे तर 'खास' पठार पाहण्यासाठी पर्यटकाबरोबर निसर्ग अभ्यासकांची पावले ही पठाराकडे वळताहेत.
Published at : 28 Sep 2024 11:47 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
करमणूक
सोलापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
