एक्स्प्लोर
PHOTO : लिंबू कलरची साडी अन् निवडणूक अधिकारी! सोशल मीडिया सेन्सेशन रीना द्विवेदी

Reena Dwivedi UP
1/9

UP Election 2022: यूपीत पाचव्या टप्प्यातील मतदान आज चालू आहे. निवडणूक राजकारण्यांचं भवितव्य ठरवणारी असते. पण कधीकधी अशा घटना घडतात ज्यामुळे सामान्य माणूसही त्या निवडणुकीचा चेहरा बनतो.
2/9

असाच निवडणुकीचा चेहरा बनलेल्या, सोशल मीडिया सेन्सेशन रीना द्विवेदी (Reena Dwivedi).
3/9

यूपी निवडणुकीत लिंबू कलरची साडी परिधान केलेल्या एका महिला अधिकाऱ्याचा फोटो वाऱ्यासारखा व्हायरल झाला.
4/9

रीना द्विवेदी यांनी म्हटलं की, मी तर सामान्य काम करत होते माझं कर्तव्य करत होते. लोकांनी एवढी पसंती दिली हे पाहून मी स्वतः हैराण आहे.
5/9

रीना द्विवेदी यांनी म्हटलं की, सरकारी कर्मचारी म्हटल्यानंतर लोकांच्या मनात काही ठराविक साचेबद्ध प्रतिमा असतात. सरकारी नोकर थकलेलाच असेल, केस विस्कटलेले असतील, त्याला फॅशन सेन्स नसेल अशी प्रतिमा असते. पण माझा गेटअप तर काही वेगळा नव्हता रोजचाच होता. त्यात कुठला बनावटपणा नव्हता, असं रीना द्विवेदी सांगतात. रीना द्विवेदी सांगतात की, यावेळी मतदान केंद्रावर पोहोचल्यावर लोक सेल्फी काढायला येत होते, मी पोहोचायच्या आधीच चर्चा सुरू होती की, यावेळी मॅडमची ड्युटी कुठे असणार. सरकारी कर्मचारी आपलं काम एंजॉय करतो हे दिसल्यामुळे कदाचित लोकांना जास्त भावलं असेल, असं देखील रीना द्विवेदी यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे.
6/9

उत्तर प्रदेशमधील देवरिया येथे रीना द्विवेदी राहतात. त्या लखनौमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागात (PWD) सहाय्यक कनिष्ठ क्लर्क या पदावर काम करतात. त्यांना आदित्य द्विवेदी नावाचा मुलगा आहे. तो सध्या शिक्षण घेत आहे.
7/9

रीना यांचे इन्स्टाग्रामवर 258k फॉलोवर्स आहेत. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत त्या पोल ड्युटीवर होत्या आणि त्यानंतर 2018 च्या महापालिका निवडणुकीत त्या मतदान केंद्र अधिकारी झाल्या.
8/9

2019 मध्ये व्हायरल झालेल्या फोटोमुळे रीना द्विवेदी चर्चेत आल्या. त्यानंतर त्यांना भोजपूरी चित्रपटांच्या ऑफर्स देखील येत होत्या. पण त्या ऑफर्स नाकारून मुलाचे शिक्षण सुरू असल्यानं त्यांनी त्याच्याकडे लक्ष केंद्रित केलं.
9/9

22 फेब्रुवारी रोजी रीना यांचा दुसरा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या फोटोमध्ये रिना या ब्लॅक टॉप, ऑफ व्हाईट कलरची पँट आणि हातात रेड बॅग अशा लूकमध्ये दिसत आहेत.
Published at : 27 Feb 2022 02:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
विश्व
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion