एक्स्प्लोर
Gyanvapi Masjid ASI Survey : ज्ञानवापीच्या तळघरात आणखी काय सापडलं?
Gyanvapi Masjid ASI Survey : ज्ञानव्यापी मशिदीच्या सर्वेक्षणावर बहिष्कार टाकण्याचा इशारा मुस्लिम पक्षाकडून देण्यात आला आहे.
Gyanvapi Masjid ASI Survey
1/8

वाराणसीमधील (Varanasi) ज्ञानव्यापी मशिद (Gyanvapi Masjid) परिसरात सध्या पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे.
2/8

तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरु होतं. ज्ञानव्यापी मशिदीच्या (Gyanvapi Mosque) तळघराचा सर्व्हे करण्यात येत आहे.
3/8

ज्ञानव्यापी मशिदीमध्ये मंदिर शैलीतील 20 कपाटं सापडल्याचा दावा करण्यात येत आहे.
4/8

हिंदू पक्षाच्या वकिलांनी शनिवारी दावा केला होता की, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (Archaeological Survey of India) विभागाला सर्वेक्षणादरम्यान मूर्तीचे अवशेष आणि काही तुटलेल्या कलाकृती सापडल्या आहेत.
5/8

दरम्यान, ASI कडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
6/8

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ASI) तिसऱ्या दिवशी ज्ञानवापीच्या तीनही घुमट आणि परिसराचे सर्वेक्षण केलं
7/8

घुमटांच्या सर्वेक्षणादरम्यान पुरातत्व विभागाला गोलाकार छतामध्ये अनेक डिझाइन आढळले. यामध्ये मंदिर शैलीतील 20 हून अधिक अलमिरा म्हणजेच भिंतीत बांधलेली कपाटं सापडल्याचा दावा हिंदू पक्षाकडून करण्यात येत आहे.
8/8

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून (ASI) ज्ञानव्यापीची रचना आणि भिंतीचं थ्री-डी मॅपिंग करण्यात आलं. दुसरीकडे, मुस्लिम पक्षाने इशारा दिला आहे की, जर मशिदीत हिंदू धर्मासंबंधित कलाकृती किंवा चिन्हं सापडल्याची अफवा पसरवली गेली तर ते संपूर्ण सर्वेक्षणावर बहिष्कार टाकतील.
Published at : 08 Aug 2023 03:43 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र


















