एक्स्प्लोर
Photo: दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांच्यासोबत छेडछाड
दिल्लीत महिला आयोगाच्या अध्यक्षाच असुरक्षित, स्वाती मालीवाल यांच्यासोबत छेडछाडीची घटना.
![दिल्लीत महिला आयोगाच्या अध्यक्षाच असुरक्षित, स्वाती मालीवाल यांच्यासोबत छेडछाडीची घटना.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/b85fa39d5db9d5526440e3ad97ac7da8167413910407093_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Swati Maliwal
1/10
![दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांना गुरुवारी पहाटे रस्त्यात एका मद्यधुंद गाडी चालकाने छेडछाड केल्याचा आणि ओढत नेल्याची घटना घडली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/2b04e526a6085e4b9ec06ee6c176d3b861030.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांना गुरुवारी पहाटे रस्त्यात एका मद्यधुंद गाडी चालकाने छेडछाड केल्याचा आणि ओढत नेल्याची घटना घडली आहे.
2/10
![या घटनेवरुन दिल्लीतील महिला आयोगाच्या अध्यक्षाच सुरक्षित नसल्याचं स्पष्ट झालं आहे. स्वत: स्वाती मालिवाल यांनी ही माहिती दिली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/2eb9d64fe6b0195713759bb7b10fa04fdb658.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या घटनेवरुन दिल्लीतील महिला आयोगाच्या अध्यक्षाच सुरक्षित नसल्याचं स्पष्ट झालं आहे. स्वत: स्वाती मालिवाल यांनी ही माहिती दिली आहे.
3/10
![स्वाती मालीवाल यांनी एक ट्वीट करत ही माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की, दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेची स्थिती काय आहे हे पाहण्यासाठी मी गेल्यानंतर एका मद्यधुंद गाडी चालकाने माझ्याशी छेडछाड केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/135841128fafb1b256554f7d05f63351c4ba2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्वाती मालीवाल यांनी एक ट्वीट करत ही माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की, दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेची स्थिती काय आहे हे पाहण्यासाठी मी गेल्यानंतर एका मद्यधुंद गाडी चालकाने माझ्याशी छेडछाड केली.
4/10
![मी त्याला पकडले त्यावेळी त्याने गाडीच्या खिडकीमध्ये हा अडकवला आणि मला ओढत नेलं. देवाने जीव वाचवला. जर दिल्लीत महिला आयोगाच्या अध्यक्षा सुरक्षित नसतील तर परिस्थितीची कल्पना करा असं त्या म्हणाल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/9dc75667e4529c94b469951683bdd84d3a734.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मी त्याला पकडले त्यावेळी त्याने गाडीच्या खिडकीमध्ये हा अडकवला आणि मला ओढत नेलं. देवाने जीव वाचवला. जर दिल्लीत महिला आयोगाच्या अध्यक्षा सुरक्षित नसतील तर परिस्थितीची कल्पना करा असं त्या म्हणाल्या.
5/10
![राजधानीतील महिलांच्या सुरक्षेची स्थिती तपासण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या असताना मालीवाल यांना स्वत:लाच छेडछाडीच्या घटनेला सामोरं जावं लागल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/7376b868442515a6d3c4ba54b44434e2633b3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राजधानीतील महिलांच्या सुरक्षेची स्थिती तपासण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या असताना मालीवाल यांना स्वत:लाच छेडछाडीच्या घटनेला सामोरं जावं लागल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
6/10
![स्वाती मालीवाल गुरुवारी पहाटे 3.11 च्या सुमारास एम्स जवळील फुटपाथवर असताना हरीश चंद्रा हा माणूस बलेनो कारमध्ये चढला आणि त्याने मालीवाल यांच्याशी छेडछाड केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/fb19c07b809ca69762e7021593a970f4ff5b4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्वाती मालीवाल गुरुवारी पहाटे 3.11 च्या सुमारास एम्स जवळील फुटपाथवर असताना हरीश चंद्रा हा माणूस बलेनो कारमध्ये चढला आणि त्याने मालीवाल यांच्याशी छेडछाड केली.
7/10
![तो खूप मद्यधुंद अवस्थेत होता. त्यावेळी महिला आयोगाची टीम त्या ठिकाणापासून काही अंतरावर होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/7412889a436fa88d7b1a9aa3d5d0311557901.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तो खूप मद्यधुंद अवस्थेत होता. त्यावेळी महिला आयोगाची टीम त्या ठिकाणापासून काही अंतरावर होती.
8/10
![स्वाती मालीवाल यांनी त्या व्यक्तीसोबत जाण्यास नकार दिल्यानंतर त्याने गाडी पुढे नेली, पण नंतर त्याने पुन्हा यू टर्न घेतला आणि स्वाती मालीवाल यांना जबरदस्तीने कारमध्ये खेचण्याचा प्रयत्न केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/adb90f85bfa4c4fab67b7be9cb71d1fca2b9e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्वाती मालीवाल यांनी त्या व्यक्तीसोबत जाण्यास नकार दिल्यानंतर त्याने गाडी पुढे नेली, पण नंतर त्याने पुन्हा यू टर्न घेतला आणि स्वाती मालीवाल यांना जबरदस्तीने कारमध्ये खेचण्याचा प्रयत्न केला.
9/10
![जेव्हा मालीवाल यांनी त्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याने त्यांना 15 मीटरपर्यंत ओढत नेले. नंतर मालीवाल यांनी स्वत:ची सुटका केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/9204e2ee8a11a81ba0dfddab254e6675efa57.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जेव्हा मालीवाल यांनी त्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याने त्यांना 15 मीटरपर्यंत ओढत नेले. नंतर मालीवाल यांनी स्वत:ची सुटका केली.
10/10
![दिल्लीतील घडलेल्या या गंभीर घटनेप्रकरणी 47 वर्षीय हरीश चंद्रा या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याची कार जप्त करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/2c2591482a6b7a196bc0594a164dc6c473f9a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिल्लीतील घडलेल्या या गंभीर घटनेप्रकरणी 47 वर्षीय हरीश चंद्रा या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याची कार जप्त करण्यात आली आहे.
Published at : 19 Jan 2023 08:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)