एक्स्प्लोर
PHOTO : आशियातला सर्वात मोठा बोगदा, काश्मीरमधील अद्भुत प्रकल्प नेमका आहे तरी कसा?
WhatsApp_Image_2021-10-04_at_1052.47_AM_(1)
1/11

श्रीानगर : हिमालयाच्या पर्वतरांगांना भेदत काश्मीरमध्ये एक अद्भुत प्रकल्प उभा राहतोय. आशियातला सर्वात मोठा बोगदा श्रीनगर लेहदरम्यानच्या रस्त्यावर तयार होतोय. या मार्गावरचा जोझिला घाट पार करायला सध्या तीन साडेतीन तास लागतात तो या प्रकल्पानंतर अवघ्या 15 मिनिटांत पार होणार आहे. नागरिकांसह लष्करालाही यामुळं फायदा होणार आहे.
2/11

श्रीनगर ते लेह दरम्यान ज्यानं कुणी प्रवास केला आहे त्याच्या अंगावर काटा आणणारा शब्द म्हणजे जोझिला. हिमालयाच्या रांगांमधला हा घाट जगातल्या सर्वात खडतर मार्गांपैकी एक गणला जातो. भौगोलिक सामरिक महत्व असलेल्या याच मार्गावर सध्या बनतोय तब्बल 14. 5 किमी लांबीचा बोगदा. हे काम तातडीनं मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकार अथक प्रयत्न करतंय.
Published at : 04 Oct 2021 12:18 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
अहमदनगर
राजकारण
विश्व























