एक्स्प्लोर
Padma Shri Award : महाराष्ट्रातील पाच मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान...
सिनेसृष्टीतील योगदानासाठी रवीना टंडन आणि ऑस्कर विजेत्या 'नाटू-नाटू' या गाण्याचे संगीतकार एमएम कीरावनी यांना 'पद्मश्री पुरस्कार' प्रदान करण्यात आला आहे.

Padma Shri Award 2023
1/9

राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये पद्म पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला. राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले.
2/9

या कार्यक्रमास उपराष्ट्रपती जगदीप धनखड़, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, केंद्रीय गृह मंत्री अमित शहा, यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्रीगण कार्यक्रमास उपस्थित होते.
3/9

एकूण 55 पद्म पुरस्कारांचे वितरण आज करण्यात आले. 3 मान्यवरांचा पद्म विभूषण, 5 मान्यवरांचा पद्म भूषण आणि 47 मान्यवरांचा पद्म श्री पुरस्काराने गौरव झाला.
4/9

गजानन माने यांना त्यांच्या सामाजिक क्षेत्राच्या कार्यासाठी आज ‘पद्म श्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले. श्री माने यांनी कुष्ट रोग्यांसाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांच्या याच कार्याचा आज सन्मान झाला.
5/9

परशुराम खुणे यांना लोककला क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी आज पद्म श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री खुणे यांनी नक्क्षल प्रभावित भागात लोककलेच्या माध्यमातून पुर्नवास आणि सामजिक कुप्रथांवर बोट ठेवून लोक जागृती केली. त्यांच्या या कार्याची दखल घेत आज त्यांना पद्म श्री पुरस्काराने गौरविण्यात आले.
6/9

कला क्षेत्रातील योगदानासाठी सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री रवीना टंडन यांना आज पद्म श्री पुरस्काराने गौरिवण्यात आले. श्रीमती टंडन या 25 वर्षांपासून चित्रपट सृष्टीत काम करीत असून अनेक सिनेमामंधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
7/9

कला क्षेत्रातील योगदानासाठी कुमी वाडीया यांना आज पद्म श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोरल संगीत ‘कंडक्ट’( संचलन) करणाऱ्या त्या प्रथम भारतीय महिला आहेत. त्यांनी आजवर देश विदेशात अनेक कार्यक्रम सादर केलेले आहेत. त्यांच्या याच कामगिरी साठी आज त्यांचा सन्मान झाला आहे.
8/9

एकूण 55 पद्म पुरस्कारांचे वितरण आज करण्यात आले.
9/9

3 मान्यवरांचा पद्म विभूषण, 5 मान्यवरांचा पद्म भूषण आणि 47 मान्यवरांचा पद्म श्री पुरस्काराने गौरव झाला.
Published at : 06 Apr 2023 02:50 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
पुणे
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
