एक्स्प्लोर
Covid19 Updates : कोरोनामुळे टेन्शन वाढलं! देशात 3380 सक्रिय कोरोना रुग्ण, नव्या मार्गदर्शक सूचना जारी
Coronavirus Cases Today in India : भारतामध्ये ओमायक्रॉनच्या BF.7 या सबव्हेरियंटचे चार रुग्ण सापडले आहेत. सध्या याच व्हेरियंटने जगभरात थैमान घातलं आहे.
Covid-19 Outbreak Updates
1/11

देशात गेल्या 24 तासांत 163 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहे. भारतातील एकूण सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या चार हजारांहून कमी आहे. सध्या देशात 3,380 कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत. (PC : istockphoto)
2/11

भारतात केंद्र सरकारने अलर्ट जारी केला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्यास आणि मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. (PC : istockphoto)
3/11

सरकारने बुधवारी झालेल्या बैठकीनंतर लोकांना आवश्यक कोरोना मार्गदर्शक तत्वे पाळण्याचे आवाहन केले. राज्यांना कोरोना संदर्भातील पुढील रणनीती आखण्याची सूचनाही केल्या आहेत. त्यानुसार राज्य सरकार खबरदारीचे उपाययोजना करताना दिसत आहे. (PC : istockphoto)
4/11

भारतामध्ये ओमायक्रॉनच्या BF.7 या सबव्हेरियंटचे चार रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. केंद्राकडून राज्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. (PC : istockphoto)
5/11

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आज 23 डिसेंबर रोजी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. यामध्ये कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आणि नियोजन करण्यात येणार आहे. (PC : istockphoto)
6/11

सरकारकडून नागरिकांना बूस्टर डोस घेण्याचं आवाहन केलं जात आहे. भारतात कोरोनाचे रुग्ण कमी असले, तर नागरिकांना निष्काळजीपणा करु नये. आरोग्याची काळजी घ्या मास्क वापरा. (PC : istockphoto)
7/11

IMA कडून 22 डिसेंबर रोजी रात्री उशिरा नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. यानुसार, लोकांना सार्वजनिक स्थळी लग्न, समारंभ, राजकीय किंवा सामाजिक सभा तसेच आंतरराष्ट्रीय प्रवास यासारखे सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (PC : istockphoto)
8/11

केंद्र सरकारकडून नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. (PC : istockphoto)
9/11

कोरोनाचा वाढता धोका पाहता कर्नाटकमध्ये (Karnataka) मास्क (Mask) वापरणे बंधनकारक करण्यात आलं आहे. कर्नाटक सरकारने एसी रूममध्ये (AC Room) आणि बंद ठिकाणी (Closed Places) मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. (PC : istockphoto)
10/11

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे की, देशभरातील रुग्णालयांना ऑक्सिजन आणि औषधांचा पुरेसा साठा ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. (PC : istockphoto)
11/11

जगात ओमायक्रॉन आणि त्याचा BF.7 सबव्हेरियंट याचा वेगाने संसर्ग होत आहे. भारतातही ओमायक्रॉनच्या सबव्हेरियंटचे तीन रुग्ण सापडल्याने प्रशासन अलर्टवर आलं आहे. (PC : istockphoto)
Published at : 23 Dec 2022 11:15 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















