एक्स्प्लोर
PHOTO : तिरडी बांधली, खांदेकरीही आले; मराठा आरक्षणासाठी निघाली 'सरकारची अंत्ययात्रा'
Maratha Reservation : छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील खामगाव (गोरक्ष) येथे आज (29 ऑक्टोबर) रोजी अंत्यसंस्कार आंदोलन करण्यात आले.
Maratha reservation protest
1/8

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे आजी माजी आमदार, खासदारसह महाराष्ट्र सरकारचा तिरडी गावामध्ये काढुन अंत्यसंस्कार करण्यात आले.
2/8

या वेळी गावातील नवतरुणासह ग्रामस्थांनी तिरडी बांधून चार खांदेकरी व पाचवा पाणोड्याअशी हूबेहूब अंत्ययात्रा काढली.
3/8

यावेळी मराठा आमदार, खासदार यांच्या नावाने बोंबाबोब करण्यात आले.
4/8

यावेळी महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात आला, तसेच वेशी मधुन ही अंत्ययात्रा काढण्यात आली.
5/8

खामगाव गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासुन स्थानिक स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रा काढून सरकारचे अंत्यसंस्कार करण्यात आले.
6/8

यावेळी गावातील नागरिकांनी लोकप्रतिनिधीनी यांना श्रद्धांजली वाहत, येणाऱ्या काळात तात्काळ आरक्षण न दिल्यास तीव्र अंदोलन करण्याचा संकल्प करण्यात केला.
7/8

याचप्रमाणे पैठण तालुक्यातील लोहगाव येथे देखील सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण करण्यात येत आहे.
8/8

तर, छत्रपती संभाजीनगर ते जालना महामार्गावरील करमाड येथे देखील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आला.
Published at : 29 Oct 2023 03:14 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आरोग्य
महाराष्ट्र
क्राईम
























