एक्स्प्लोर
आता ब्राह्मण समाज देखील उतरलं रस्त्यावर, पाहा फोटो
छत्रपती संभाजीनगर: राज्यात मराठा, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच आता ब्राह्मण समाज देखील रस्त्यावर उतरला आहे.
brahmin samaj morcha in chhatrapati sambhajinagar
1/8

छत्रपती संभाजीनगर येथे आज (10 ऑक्टोबर) ब्राह्मण संघटनांच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आहे.
2/8

शहरातील वंदे मातरम् हॉलपासून निघालेला हा मोर्चा दिल्ली गेटजवळ असलेल्या विभागीय आयुक्त कार्यलयावर धडकणार आहे.
3/8

ब्रह्मणांसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी, तसेच समाजातील विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण मोफत करावे या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा निघाला आहे.
4/8

दरम्यान, या मोर्च्याच्या निमित्ताने सर्वचं ब्राह्मण संघटना एकत्रित आल्याचे पाहायला मिळत आहे.
5/8

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज ब्राम्हण समाजाकडून भव्य असा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्च्यात आंदोलकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
6/8

तर महिलांची देखील लक्षणीय उपस्थितीती दिसत आहे. ब्रह्मणांसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी ही प्रमुख मागणी यावेळी ब्राम्हण समाजाकडून करण्यात येत आहे.
7/8

दरम्यान, या मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे.
8/8

काही वेळातचं हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत पोहचणार आहे. त्यानंतर आपल्या मागण्याचे निवेदन ब्राम्हण समाजाकडून विभागीय आयुक्त कार्यालयात दिला जाणार आहे.
Published at : 10 Oct 2023 01:06 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर
राजकारण























