एक्स्प्लोर
Buldhana : बुलढाण्यात पावसासाठी शेतकऱ्यांचा प्रयोग; बांधावरुन सोडली मिठाची धुरी
Buldhana News : पाऊस पडावा यासाठी बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अनोखा प्रयोग केला आहे.
Buldhana News
1/9

पावसाळा सुरु होऊन एक महिना झालं तरी अद्याप राज्यात काही भागात पाऊस पडताना दिसत नाही. त्यामुळं शेतकरी (Farmers) चिंतेत आहे.
2/9

अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळं पाऊस पडावा यासाठी बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अनोखा प्रयोग केला आहे.
3/9

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी शेताच्या बांधावरुन मिठाची धुरी सोडली आहे.
4/9

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले आदिवासी बांधव पाऊस पडावा म्हणून हा प्रयोग करत आहेत.
5/9

आदिवासी बांधव शास्त्रीय प्रयोग करत आहेत. याला "धूळपेरणी " अर्थात " क्लाऊड सेडिंग" म्हणतात. धूळ पेरणी म्हणजे आकाशात जमलेल्या ढगांना मिठाची धुरी देणे.
6/9

मिठाची धुरी दिल्याने पाऊस पडतो असा काहीसा समज आहे.. मात्र याला शास्त्रीय कारण आहे.
7/9

कृत्रिम पावसाच्या प्रयोगात आकाशातील ढगांवर मिठाच पाणी अर्थात सोडियम क्लोराईड आणि सिल्व्हर आयोडाईड याचे मिश्रण असलेलं पाणी विमानातून फवारतात.
8/9

मिठाच्या कणामध्ये पाणी शोषून घेण्याचे गुणधर्म असल्यानं ढगतील पाणी मिठाचे कण शोषून घेतात.
9/9

संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी मिठाची धुरी देऊन ढगांना कळ देऊन कृत्रिम पावसाचा प्रयोग करत आहेत. जाळात मीठ टाकल्याने त्याचा धूर काही अशी का होईना ढगांपर्यांत पोहोचून पाऊस पडेल अशी आशा या भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांची आहे.
Published at : 02 Jul 2023 10:30 AM (IST)
आणखी पाहा






















