एक्स्प्लोर
PHOTO: मकरसंक्रांतीला सौभाग्याचं लेणं विधवांच्याही पदरी; बीडमधील अनोख्या उपक्रमाचं होतंय कौतुक
Makar Sankranti 2023 : मकरसंक्रांतीला विधवा महिलांना देखील तेवढाच सन्मान मिळावा म्हणून बीडमध्ये 'मकर संक्रात कुंकवा पलीकडची' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं
![Makar Sankranti 2023 : मकरसंक्रांतीला विधवा महिलांना देखील तेवढाच सन्मान मिळावा म्हणून बीडमध्ये 'मकर संक्रात कुंकवा पलीकडची' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/9057ad58d375055839f5c34dd54b4e36167369320151684_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Makar Sankranti 2023
1/10
![मकरसंक्रांत (Makar Sankrant) म्हटलं सौभाग्याचं लेणं लेऊन साजरा केला जाणारा सण.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/096c4d689671d3a2243e462f1165b510fb295.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मकरसंक्रांत (Makar Sankrant) म्हटलं सौभाग्याचं लेणं लेऊन साजरा केला जाणारा सण.
2/10
![आपापसात गोडवा निर्माण व्हावा म्हणून महिला तीळगूळ वाटून मकरसंक्रांत साजरी करतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/17be2d4c1772b53f4b6d4f82393fa858e6c61.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपापसात गोडवा निर्माण व्हावा म्हणून महिला तीळगूळ वाटून मकरसंक्रांत साजरी करतात.
3/10
![याच मकरसंक्रांतीला विधवा महिलांना देखील तेवढाच सन्मान मिळावा म्हणून बीडमध्ये 'मकर संक्रात कुंकवा पलीकडची' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/26014fe390143bfa2a4b7c21f71ff5b370c10.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याच मकरसंक्रांतीला विधवा महिलांना देखील तेवढाच सन्मान मिळावा म्हणून बीडमध्ये 'मकर संक्रात कुंकवा पलीकडची' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं
4/10
![बीडच्या काकडहिरा गावात विधवा महिलांच्या सन्मानासाठी मकरसंक्रातीचा सोहळा रंगला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/da37962a14aeaff09023199d47b973814d190.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बीडच्या काकडहिरा गावात विधवा महिलांच्या सन्मानासाठी मकरसंक्रातीचा सोहळा रंगला.
5/10
![प्रतिभा हावळे आणि मनीषा जायभाये या दोघी मैत्रिणी गेल्या पाच वर्षांपासून वेगवेगळ्या गावात संक्रांतीच्या सणानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करतात..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/fbb232170ba3c756af31f237e5777bc586ee0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रतिभा हावळे आणि मनीषा जायभाये या दोघी मैत्रिणी गेल्या पाच वर्षांपासून वेगवेगळ्या गावात संक्रांतीच्या सणानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करतात..
6/10
![विधवा झाल्यानंतर आपल्याला जी वागणूक मिळाली ती इतर महिलांना मिळू नये म्हणून या दोघींनी या उपक्रमाची सुरुवात केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/d940047933bd1f901d42b129738924993d229.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विधवा झाल्यानंतर आपल्याला जी वागणूक मिळाली ती इतर महिलांना मिळू नये म्हणून या दोघींनी या उपक्रमाची सुरुवात केली.
7/10
![या कार्यक्रमात शंभरच्या वर विधवा महिलांना साडीचोळीचं वाटप करण्यात आलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/493d9084733fd1da356ef679b186a6122c941.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या कार्यक्रमात शंभरच्या वर विधवा महिलांना साडीचोळीचं वाटप करण्यात आलं.
8/10
![आपल्या पतीच्या निधनानंतर अनेक महिलांनी संक्रांतीचा सण साजरा केला नव्हता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/f57152a759191f0026a407f26e68da909726c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपल्या पतीच्या निधनानंतर अनेक महिलांनी संक्रांतीचा सण साजरा केला नव्हता.
9/10
![आज मात्र या ठिकाणी या महिलांचा जो सन्मान झाला तो पाहून या महिला भारावून गेल्या होत्या आणि त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाचा गोडवा निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/a1886b844a4bf88f43322f2e8cecfbab1bf22.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज मात्र या ठिकाणी या महिलांचा जो सन्मान झाला तो पाहून या महिला भारावून गेल्या होत्या आणि त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाचा गोडवा निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.
10/10
![कुणाला अपघाताने तर कुणाला नशिबाने अकाली विधवापण येते म्हणून त्यांना कायम दुय्यम वागणूक दिली जाते. म्हणूनच कुकंवा पलीकडची ही संक्रांत आपल्या समाजा समोरचा मोठा आदर्श म्हटला पाहिजे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/6f63b12cd02699a1f60fc491492bdcd2cdb09.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कुणाला अपघाताने तर कुणाला नशिबाने अकाली विधवापण येते म्हणून त्यांना कायम दुय्यम वागणूक दिली जाते. म्हणूनच कुकंवा पलीकडची ही संक्रांत आपल्या समाजा समोरचा मोठा आदर्श म्हटला पाहिजे.
Published at : 15 Jan 2023 04:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)