एक्स्प्लोर
मुंबईहून सातारा एका चार्जमध्ये गाठते 'ही' इलेक्ट्रिक स्कूटर, जबरदस्त लूकसह मिळतील हे फीचर्स

Horwin SK3
1/6

सध्या जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. अशातच अनेक स्टार्टअप कंपन्या आपल्या नवीन इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात सादर करताना दिसत आहेत.
2/6

यातच आता EV वाहन निर्माता हॉर्विनने आपल्या देशांतर्गत बाजारात नवीन 2022 SK3 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. नवीन SK3 लाँग रेंज EV म्हणून सादर केली जाणार आहे. जी कनेक्टिव्हिटी फीचर्स आणि उत्तम बूट स्पेसला सपोर्ट करते.
3/6

कंपनीने 2021 मध्ये लॉंच केलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज 80 किमी इतकी होती. नवीन अपडेटेड ट्विन बॅटरी सेटअपमुळे आता याची रेंज 300 किमी इतकी वाढली आहे. दोन्ही नवीन बॅटरी एकाच चार्जवर 160 किमी अंतर कापण्यास सक्षम आहेत. या बॅटरी एकसोबत जोडण्याची गरज नाही. एकल बॅटरी कॉन्फिगरेशनमध्येही, SK3 सध्या भारतीय बाजारपेठेत विकल्या जाणार्या बहुतेक इलेक्ट्रिक स्कूटरपेक्षा अधिक श्रेणी ऑफर करते.
4/6

नवीन Horwin SK3 ला 72V 36Ah बॅटरी पॅक मिळतो. जो 6.3kW पॉवर आउटपुटसह 3.1kW मोटरला पॉवर देते. ही मोटर स्कूटरला ताशी 90 किमी वेगाने नेऊ शकते. ही स्कूटर नुकतीच चीनमध्ये लॉन्च करण्यात आली आहे.
5/6

यामध्ये कंपनीने अनेक नवीन फीचर्स दिले आहेत, ज्यामुळे ही स्कूटर अतिशय आधुनिक बनते. याच्या काही खास फीचर्समध्ये फुल-कलर TFT डिस्प्ले, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कीलेस पॉवर सिस्टम आणि क्रूझ कंट्रोल यांचा समावेश आहे. लुकबद्दल बोलायचे झाल्यास, यात शार्प आणि मस्क्यूलर बॉडी पॅनेल्स मिळतो. जो याला दिसायला आणखी प्रीमियम बनवतो. याच्या समोरील बाजूस एक ट्विन-बीम एलईडी हेडलॅम्प आहे.
6/6

चीन व्यतिरिक्त, हॉर्विनची युरोपियन बाजारपेठेत देखील विक्री केली जात आहे. दरम्यान, ही स्कूटर लवकरच भारतीय बाजारात लॉन्च होण्याची शक्यता नाही. एथर एनर्जी आणि ओला इलेक्ट्रिक रिटेल सारख्या ईव्ही निर्मात्या भारतीय ग्राहकांसाठी काही अतिशय आशादायक इलेक्ट्रिक स्कूटर आहेत.
Published at : 04 May 2022 05:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion