Audi Q3 Sportback bookings now open: जर्मन लक्झरी कार उत्पादक ऑडीने आज भारतात ऑल-न्यू ऑडी क्यू 3 स्पोर्टबॅकसाठी बुकिंग सुरु केली आहे. नवीन ऑडी क्यू 3 स्पोर्टबॅक स्पोर्टी आणि आकर्षक आहे.
2/8
स्टँडर्ड म्हणून क्वॉट्रो ऑल-व्हील ड्राइव्हसह सुसज्ज ऑडी क्यू 3 स्पोर्टबॅकमध्ये 2.0 लिटर टीएफएसआय पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.
3/8
हे इंजिन 190 एचपी पॉवर आणि 320 एनएम टॉर्क जनरेट करते. ग्राहक नवीन ऑडी क्यू 3 स्पोर्टबॅक 2 लाख रूपयांच्या टोकन रक्कमसह बुक बुक करू शकता. याच कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ....
4/8
नवीन ऑडी क्यू 3 स्पोर्टबॅक टर्बो ब्ल्यू, ग्लेशियर व्हाइट, क्रोनोस ग्रे, मिथोस ब्लॅक आणि नवेरा ब्ल्यू या या पाच आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल.
5/8
ऑडी इंडिया वेबसाइट (www.audi.in) आणि ‘मायऑडी कनेक्ट’ अॅपच्या माध्यमातून ऑनलाइन बुक करता येऊ शकते.
6/8
ही सेगमेंटमधील पहिली कॉम्पॅक्ट कूपे क्रॉसओव्हर आहे.
7/8
या कारच्या एक्स्टीरिअर फीचर्समध्ये एलईडी हेडलाइट्ससह एलईडी रिअर कॉम्बीनेशन लॅम्प्स, पॅनोरॅमिक ग्लास सनरूफ, कम्फर्ट की सह गेस्चर-कंट्रोल्ड टेलगेट, 5 स्पोक व्ही स्टाइल ‘एस डिझाइन’ आर 18 अलॉई व्हील्स आणि हाय ग्लॉस स्टायलिंग पॅकेज आदींचा समावेश आहे.
8/8
तसेच इंटीरिअर फीचर्समध्ये ऑडी व्हर्च्युअल कॉकपीट प्लस, एमएमआय नेव्हिगेशन प्लस सह एमएमआय टच, ऑडी ड्राइव्ह सिलेक्ट, ऑडी फोन बॉक्स सह वायरलेस चार्जिंग, 2-झोन क्लायमेट कंट्रोल, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल फ्रण्ट सीट्ससह फोर-वे लंबर सपोर्ट, अॅम्बियण्ट लायटिंग पॅकेज प्लस आणि ऑडी साऊंड सिस्टम देण्यात आले आहे.