एक्स्प्लोर
Ahmednagar : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिशिंगणापूर येथे श्री शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेतले.
Ahmednagar : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून शनी देवाला तेलाभिषेक
President draupadi murmu visited Shanishinganapur
1/10

आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिशिंगणापूर येथे श्री शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेत पूजा केली.(Photo Credit : PTI)
2/10

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अहमदनगर येथील शनिशिंगणापूर मंदिरात चौथऱ्यावर जाऊन शनि देवाचं दर्शन घेतलं.(Photo Credit : PTI)
3/10

शनि देवाचं दर्शन घेताना त्यांनी तेलाभिषेक केला आणि विधिवत पूजा केली. (Photo Credit : PTI)
4/10

यावेळी राष्ट्रपतींची कन्या देखील शनिदेवाचे दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या.(Photo Credit : PTI)
5/10

महिलांसाठी प्रवेशबंदी असलेल्या शनिशिंगणापूरमधील चौथऱ्यावर जाऊन राष्ट्रपती मुर्मू यांनी शनीदेवाला अभिषेक केला.(Photo Credit : PTI)
6/10

शनिशिंगणापूरच्या इतिहासात देशाच्या राष्ट्रपती प्रथमच दर्शनासाठी आल्या.(Photo Credit : PTI)
7/10

राष्ट्रपती मुर्मू यांनी पूजेनंतर साध्या पदार्थांचा समावेश असलेला महाप्रसाद मंदिराच्या कार्यालयात घेतला.(Photo Credit : PTI)
8/10

या महाप्रसादात करडीची भाजी, मोड आलेली मटकी, वरण-भात आणि साधी चपाती यांचा समावेश होता.(Photo Credit : PTI)
9/10

राज्यपाल रमेश बैस, अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि कृषी मंत्री दादा भुसे हे मंदिरात उपस्थित होते.(Photo Credit : PTI)
10/10

तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे आणि अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील देखील येथे उपस्थित होते (Photo Credit : PTI)
Published at : 30 Nov 2023 03:28 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
मुंबई
मुंबई


















