एक्स्प्लोर
World Expensive Train Ticket: या काही ट्रेनच्या तिकिटांच्या किमती इतक्या आहेत की यात खरेदी करू शकता नवी कोरी कार, पाहा यादी
Expensive Train Ticket: जगात वाहतुकीसाठी अनेक प्रकारची साधने आहेत, पण या सर्वात रेल्वे प्रवास अतिशय आरामदायी मानला जातो. जगात अशा काही ट्रेन आहेत, ज्याचे एका व्यक्तीचे भाडे लाखांत आहे.
![Expensive Train Ticket: जगात वाहतुकीसाठी अनेक प्रकारची साधने आहेत, पण या सर्वात रेल्वे प्रवास अतिशय आरामदायी मानला जातो. जगात अशा काही ट्रेन आहेत, ज्याचे एका व्यक्तीचे भाडे लाखांत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/25/1bfaf7b993822f69b151821a9aadd9021682408586565713_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Most Expensive Train Tickets
1/12
![भारतात धावणारी महाराजा एक्सप्रेस ही जगातील सर्वात महागडी ट्रेन आहे. या ट्रेनमध्ये एकाच व्यक्तीचे भाडे 2 लाख 77 हजार 210 रुपये इतके आहे. ही ट्रेन दिल्लीहून सुटते आणि 7 ठिकाणचा प्रवास पूर्ण करते. बिकानेर, जयपूर, जोधपूर, उदयपूर, रणथंभोर या ठिकाणी ही ट्रेन थांबते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/25/b129588e907c0573690744a26fdc0cf2c8243.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतात धावणारी महाराजा एक्सप्रेस ही जगातील सर्वात महागडी ट्रेन आहे. या ट्रेनमध्ये एकाच व्यक्तीचे भाडे 2 लाख 77 हजार 210 रुपये इतके आहे. ही ट्रेन दिल्लीहून सुटते आणि 7 ठिकाणचा प्रवास पूर्ण करते. बिकानेर, जयपूर, जोधपूर, उदयपूर, रणथंभोर या ठिकाणी ही ट्रेन थांबते.
2/12
![गोल्डन ईगल ट्रान्स-सायबेरियन एक्सप्रेस, म्हणजेच रशियातील प्रसिद्ध ट्रान्स-सायबेरियन रेल्वे ही खूप महागडी ट्रेन आहे. यामध्ये एका माणसाचे भाडे 1 लाख 75 हजार 416 रुपये इतके आहे. ही रशियातील सर्वात आरामदायी ट्रेन आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/25/78db6c513df91d88c27973f550d38db197e15.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गोल्डन ईगल ट्रान्स-सायबेरियन एक्सप्रेस, म्हणजेच रशियातील प्रसिद्ध ट्रान्स-सायबेरियन रेल्वे ही खूप महागडी ट्रेन आहे. यामध्ये एका माणसाचे भाडे 1 लाख 75 हजार 416 रुपये इतके आहे. ही रशियातील सर्वात आरामदायी ट्रेन आहे.
3/12
![गोल्डन ईगल ट्रान्स-सायबेरियन एक्सप्रेस ही एक खासगी ट्रेन आहे. ट्रेनमधील संपूर्ण प्रवासात तुम्ही त्याच प्रवाशांसोबत असतात. ही ट्रेन विविध ठिकाणे एक्स्प्लोर करण्यासाठी विशिष्ट थांबे घेते, जिथे मार्गदर्शक तुम्हाला मार्गदर्शन करतो. तर, ट्रेनमधील संध्याकाळ तुम्ही बार लाउंजमध्ये घालवू शकतात, जिथे तुम्हाला रशियन लाईव्ह म्युझिक अनुभवता येईल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/25/0e15b51b2e16fb7434afd57c2e435ed105313.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गोल्डन ईगल ट्रान्स-सायबेरियन एक्सप्रेस ही एक खासगी ट्रेन आहे. ट्रेनमधील संपूर्ण प्रवासात तुम्ही त्याच प्रवाशांसोबत असतात. ही ट्रेन विविध ठिकाणे एक्स्प्लोर करण्यासाठी विशिष्ट थांबे घेते, जिथे मार्गदर्शक तुम्हाला मार्गदर्शन करतो. तर, ट्रेनमधील संध्याकाळ तुम्ही बार लाउंजमध्ये घालवू शकतात, जिथे तुम्हाला रशियन लाईव्ह म्युझिक अनुभवता येईल.
4/12
![स्कॉटलंडची रॉयल स्कॉट्समन लक्झरी ट्रेन प्रवासादरम्यान प्रवाशांना स्कॉटिश हाईलँड्समधून घेऊन जाते. या लॅविश ट्रेनमध्ये हॉटेलसारखे जेवण आहे. या ट्रेनसाठी एका व्यक्तीच्या तिकीटाची किंमत 1 लाख 74 हजार 138 रुपये आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/25/e769d3e784ea8e3238912b143612171889500.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्कॉटलंडची रॉयल स्कॉट्समन लक्झरी ट्रेन प्रवासादरम्यान प्रवाशांना स्कॉटिश हाईलँड्समधून घेऊन जाते. या लॅविश ट्रेनमध्ये हॉटेलसारखे जेवण आहे. या ट्रेनसाठी एका व्यक्तीच्या तिकीटाची किंमत 1 लाख 74 हजार 138 रुपये आहे.
5/12
![रॉयल स्कॉट्समन लक्झरी ट्रेनमध्ये 40 हून अधिक प्रवासी नसतात. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाकडे विशेष लक्ष दिले जाते. प्रवाशांचा प्रवास आरामदायी कसा होईल, याकडे ट्रेनमधील कर्मचाऱ्यांचा कल असतो. या ट्रेनमध्ये विविध प्रकारची आरामदायी आसनव्यवस्था आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/25/382cd930caed2dd2debf07be5967ae9d2833f.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रॉयल स्कॉट्समन लक्झरी ट्रेनमध्ये 40 हून अधिक प्रवासी नसतात. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाकडे विशेष लक्ष दिले जाते. प्रवाशांचा प्रवास आरामदायी कसा होईल, याकडे ट्रेनमधील कर्मचाऱ्यांचा कल असतो. या ट्रेनमध्ये विविध प्रकारची आरामदायी आसनव्यवस्था आहे.
6/12
![दक्षिण आफ्रिकेतील रोवोस रेल प्राइड ही सर्वात भव्य अशी ट्रेन मानली जाते. आफ्रिकेतील या ट्रेनच्या तिकिटाची किंमत 1 लाख 69 हजार 968 रुपये इतकी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/25/bb72505c9ac6f8fa356e239d9ad2959f5900f.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दक्षिण आफ्रिकेतील रोवोस रेल प्राइड ही सर्वात भव्य अशी ट्रेन मानली जाते. आफ्रिकेतील या ट्रेनच्या तिकिटाची किंमत 1 लाख 69 हजार 968 रुपये इतकी आहे.
7/12
![रोवोस रेल प्राइड या ट्रेनची विंटेज थीम आहे. लाकडी पॅनलच्या या ट्रेनमध्ये 72 प्रवासी क्षमता आहे. उत्तम खाद्यासह दक्षिण आफ्रिकेतील उत्कृष्ट वाईन ट्रेनमध्ये सर्व्ह केल्या जातात. आरामदायी आसनांवर बसून खिडकीबाहेरील मोहक निसर्गाचा आनंद तुम्ही घेऊ शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/25/e6a65681c04135dda9795a105731d37b5c991.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोवोस रेल प्राइड या ट्रेनची विंटेज थीम आहे. लाकडी पॅनलच्या या ट्रेनमध्ये 72 प्रवासी क्षमता आहे. उत्तम खाद्यासह दक्षिण आफ्रिकेतील उत्कृष्ट वाईन ट्रेनमध्ये सर्व्ह केल्या जातात. आरामदायी आसनांवर बसून खिडकीबाहेरील मोहक निसर्गाचा आनंद तुम्ही घेऊ शकता.
8/12
![द ईस्टर्न आणि ओरिएंटल एक्स्प्रेस ही आशियातील एक अतिशय आलिशान ट्रेन आहे. यामध्ये तिकिटाची किंमत 1 लाख 29 हजार 673 रुपये इतकी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/25/6f73988b9fd78936f0f88e044cf11d163bbcd.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
द ईस्टर्न आणि ओरिएंटल एक्स्प्रेस ही आशियातील एक अतिशय आलिशान ट्रेन आहे. यामध्ये तिकिटाची किंमत 1 लाख 29 हजार 673 रुपये इतकी आहे.
9/12
![व्हेनिस सिम्पलॉन ओरिएंट एक्सप्रेस ही ट्रेन लंडनपासून इटलीच्या व्हेनिस शहरापर्यंत धावते.या ट्रेनमध्ये पंचतारांकित हॉटेल्ससारख्या सुविधा उपलब्ध असतात. पूर्वी ही ट्रेन पॅरिस, लंडन, व्हिएन्ना या शहरांतून प्रवास करायची.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/25/c458f546854d6f28c268f97e6ffc713be688c.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
व्हेनिस सिम्पलॉन ओरिएंट एक्सप्रेस ही ट्रेन लंडनपासून इटलीच्या व्हेनिस शहरापर्यंत धावते.या ट्रेनमध्ये पंचतारांकित हॉटेल्ससारख्या सुविधा उपलब्ध असतात. पूर्वी ही ट्रेन पॅरिस, लंडन, व्हिएन्ना या शहरांतून प्रवास करायची.
10/12
![Eastern & Oriental Express ही ट्रेन सिंगापूर, मलेशिया आणि थायलंड दरम्यान प्रवाशांनी घेऊन जाते.या ट्रेनमध्ये थाई स्पाची सुविधा उपलब्ध आहे. सुंदर शहरातून प्रवास करणाऱ्या या ट्रेनमध्ये मनमोहक दृश्यांसह उत्कृष्ट जेवणाचा आनंद घेता येतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/25/b76ed255d011a730fd6284c28059ba264c0b7.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Eastern & Oriental Express ही ट्रेन सिंगापूर, मलेशिया आणि थायलंड दरम्यान प्रवाशांनी घेऊन जाते.या ट्रेनमध्ये थाई स्पाची सुविधा उपलब्ध आहे. सुंदर शहरातून प्रवास करणाऱ्या या ट्रेनमध्ये मनमोहक दृश्यांसह उत्कृष्ट जेवणाचा आनंद घेता येतो.
11/12
![रॉयल कॅनेडियन पॅसिफिक ही एक नेत्रदीपक ट्रेन राइड देते. जी प्रवाशांना आश्चर्यकारक कॅनेडियन रॉकीजकडे घेऊन जाते. ही कॅनडाची प्रसिद्ध ट्रेन आहे. या ट्रेनच्या तिकिटाची किंमत 1 लाख 18 हजार 115 रुपये इतकी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/25/c9a79d568935f6eb24940af60330b3183a109.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रॉयल कॅनेडियन पॅसिफिक ही एक नेत्रदीपक ट्रेन राइड देते. जी प्रवाशांना आश्चर्यकारक कॅनेडियन रॉकीजकडे घेऊन जाते. ही कॅनडाची प्रसिद्ध ट्रेन आहे. या ट्रेनच्या तिकिटाची किंमत 1 लाख 18 हजार 115 रुपये इतकी आहे.
12/12
![तुम्हाला जर सुंदर, मनमोहक निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर रॉयल कॅनेडियन पॅसिफिक ही ट्रेन उत्तम आहे. या ट्रेनमधून दिसणारी शहरं आणि त्यांची सुंदरता शब्दांपलीकडे आहे. या ट्रेनमध्ये पंचतारांकित हॉटोलदेखील आहे, जिथे तुम्हाला उत्कृष्ट पदार्थांचा स्वाद घेता येईल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/25/656f095d168b21bbfbabb005594f32f2e3ecf.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुम्हाला जर सुंदर, मनमोहक निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर रॉयल कॅनेडियन पॅसिफिक ही ट्रेन उत्तम आहे. या ट्रेनमधून दिसणारी शहरं आणि त्यांची सुंदरता शब्दांपलीकडे आहे. या ट्रेनमध्ये पंचतारांकित हॉटोलदेखील आहे, जिथे तुम्हाला उत्कृष्ट पदार्थांचा स्वाद घेता येईल.
Published at : 25 Apr 2023 02:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)