एक्स्प्लोर
Teachers Day 2024 Wishes: शिक्षक दिनानिमित्त 'या' खास फोटोसहित शुभेच्छा, संदेश शिक्षकांना पाठवा, आशीर्वाद मिळवा!
Teachers Day 2024 Wishes In Marathi : जर तुम्हाला तुमच्या प्रिय गुरूंप्रती तुमचे प्रेम व्यक्त करायचे असेल, तर आम्ही तुमच्यासाठी काही फोटोसहित शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत.

Teachers Day 2024 Wishes In Marathi Send special image wishes
1/9

तुमच्यासारखा शिक्षक मिळणं हे आशिर्वादापेक्षा कमी नाही... माझं जग बदलण्यासाठी खूप-खूप धन्यवाद.. शिक्षकदिनांनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
2/9

काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूची अक्षरे उमटवत, हजारोंच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
3/9

आयुष्याला आकार,आधार आणि अमर्याद ज्ञान देणारे प्रत्येक गुरुवर्यास शतशः नमन… शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
4/9

शि म्हणजे शीलवान, क्ष म्हणजे क्षमाशील, क म्हणजे कर्तव्येनिष्ठ, अशा सर्वच शिक्षकांना वंदन.. शिक्षकदिनांचा हार्दिक शुभेच्छा..
5/9

आपण केवळ आमचे शिक्षक नाही.. आपण आमचे मित्र, तत्वज्ञानी आणि मार्गदर्शक आहात.. सर्व एका व्यक्तीमध्ये आकार घेतलेले.. तुमच्या पाठिंब्याबद्दल नेहमी आभारी राहू.. शिक्षक दिनाच्या शुभेच्छा...
6/9

माझे आईवडिल, नातेवाईक, गुरुजन, बालपण पासून ते आजपर्यंतचा मित्रपरिवार आणि ज्ञात अज्ञातपणे मला काही ना काही शिकवून गेले, अश्या सर्व शिक्षकांना वंदन...
7/9

गुरुविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान.. जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया.. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
8/9

शिक्षणाच्या ज्योतीतून अज्ञानाचा अंधार दूर करत नवभारताची सुशिक्षित पिढी घडविणाऱ्या सर्व शिक्षकांना शत शत नमन! शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
9/9

गुरूने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवु हा पुढे वारसा, शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
Published at : 04 Sep 2024 03:17 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रायगड
अहमदनगर
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
