एक्स्प्लोर
Ashadhi Wari: अमेरिकेच्या ह्यूस्टन टेक्सास शहरात एकादशी साजरी, पालखीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी
Ashadhi Wari : डोक्यावर तुळस, मुखी माऊलीचे नाव, गळ्यात तुळशीच्या माळा, कपाळी बुक्का, खाद्यांवर पताका आणि हातात टाळ-मृदंग अशा वेशात अमेरीकेत भारतीय वारकरी वारीत तल्लीन झाले आहेत.

Ashadhi Wari
1/10

महाराष्ट्रात आषाढी एकादशी आनंद सोहळा साजरा होत असतानाच साता समुद्रापलीकडे अमेरिकेतही आषाढीचा सोहळा साजरा करण्यात आलाय.
2/10

मावळा ऑफ अमेरिका संस्थेच्या वतीनं अमेरिकेच्या टेक्सासमधील ह्युस्टन शहरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी साजरी करण्यात आली.
3/10

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीची शोभायात्राही काढण्यात आली.
4/10

48 डिग्री सेल्सिअसच्या तापमानातही भारतीय मोठ्या संख्येने पालखीत सहभागी झाले होते.
5/10

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी भेटीनंतर सर्वांनी भजन, कीर्तन गायलं, तसंच फुगड्या खेळत आनंद साजरा केला.
6/10

देशाबाहेर पहिल्यांदाच अमेरिकेत वारीचा उत्साह पाहायला मिळाला.
7/10

ही सातासमुद्रापार अमेरिकेतील वारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
8/10

डोक्यावर तुळस, मुखी माऊलीचे नाव, गळ्यात तुळशीच्या माळा, कपाळी बुक्का, खाद्यांवर पताका आणि हातात टाळ-मृदंग अशा वेशात अमेरीकेत भारतीय वारकरी वारीत तल्लीन झाले आहेत.
9/10

काही फुगडी खेळताना दिसत आहेत तर काही हरिनामाचे भजन टाळ-मृदुंगात वाजवताना दिसत आहे.
10/10

काही डोक्यावर तुळस घेऊन वारीत सहभागी झालेले दिसत आहेत
Published at : 29 Jun 2023 10:28 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बॉलीवूड
विश्व
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
