एक्स्प्लोर
Skin Care: स्किन टॅनिंगमुळे त्रस्त आहात? कच्चा बटाटा ठरेल लाभदायी; 'अशा' प्रकारे करा वापर
Skin Care Tips: बटाट्यामुळे चेहऱ्याच्या टॅनिंगची समस्या, काळे डाग दूर होऊ शकतात. जाणून घेऊया त्याबद्दल...
Potato Face Pack
1/9
![आपल्याकडे स्वयंपाकात, भाजीमध्ये बटाट्याचा वापर जास्त केला जातो. स्वयंपाकघरातही ते सहज उपलब्ध असतात. तुम्हाला माहीत आहे का बटाट्यामुळे चेहऱ्याच्या टॅनिंगची समस्या दूर होऊ शकते?](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आपल्याकडे स्वयंपाकात, भाजीमध्ये बटाट्याचा वापर जास्त केला जातो. स्वयंपाकघरातही ते सहज उपलब्ध असतात. तुम्हाला माहीत आहे का बटाट्यामुळे चेहऱ्याच्या टॅनिंगची समस्या दूर होऊ शकते?
2/9
![बटाटे त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहेत. यामध्ये लोह, पोटॅशियम, व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-डी असे गुणधर्म असतात.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
बटाटे त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहेत. यामध्ये लोह, पोटॅशियम, व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-डी असे गुणधर्म असतात.
3/9
![डोळ्यांना थंडावा देण्यासाठी कच्चे बटाटे कापून डोळ्यांवर ठेवण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. तर, त्वचेसाठी देखील कच्चा बटाटा योग्य पद्धतीने वापरला, तर फायदेशीर ठरतो.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
डोळ्यांना थंडावा देण्यासाठी कच्चे बटाटे कापून डोळ्यांवर ठेवण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. तर, त्वचेसाठी देखील कच्चा बटाटा योग्य पद्धतीने वापरला, तर फायदेशीर ठरतो.
4/9
![चेहऱ्यावर किंवा शरीराच्या कोणत्याही भागावर खूप टॅनिंग झाले असेल, तर तुम्ही तिथे बटाट्याचा पॅक लावा.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
चेहऱ्यावर किंवा शरीराच्या कोणत्याही भागावर खूप टॅनिंग झाले असेल, तर तुम्ही तिथे बटाट्याचा पॅक लावा.
5/9
![यासाठी कच्चा बटाटा, गुलाबजल आणि मुलतानी माती एकत्र मिसळा. हा पॅक बनवण्यासाठी प्रथम कच्चे बटाटे किसून घ्या. त्यात आवश्यकतेनुसार मुलतानी माती आणि गुलाबपाणी मिसळून लावा.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
यासाठी कच्चा बटाटा, गुलाबजल आणि मुलतानी माती एकत्र मिसळा. हा पॅक बनवण्यासाठी प्रथम कच्चे बटाटे किसून घ्या. त्यात आवश्यकतेनुसार मुलतानी माती आणि गुलाबपाणी मिसळून लावा.
6/9
![हा पॅक 15 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या, नंतर चेहरा धुवा. असे नियमित केल्याने तुमच्या त्वचेवरील टॅनिंग देखील निघून जाईल आणि तुमची त्वचा देखील चमकू लागेल.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
हा पॅक 15 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या, नंतर चेहरा धुवा. असे नियमित केल्याने तुमच्या त्वचेवरील टॅनिंग देखील निघून जाईल आणि तुमची त्वचा देखील चमकू लागेल.
7/9
![चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी बटाटा आणि हळदीचा फेस पॅक लाभदायी ठरतो.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी बटाटा आणि हळदीचा फेस पॅक लाभदायी ठरतो.
8/9
![यासाठी अर्धा बटाटा किसून, त्यात चिमूटभर हळद घाला. हा पॅक मानेपासून चेहऱ्यापर्यंत लावा. अर्धा तास तसाच राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
यासाठी अर्धा बटाटा किसून, त्यात चिमूटभर हळद घाला. हा पॅक मानेपासून चेहऱ्यापर्यंत लावा. अर्धा तास तसाच राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
9/9
![बटाटा पॅकच्या रोजच्या वापराने चेहऱ्याचा रंगही उजळ होतो.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
बटाटा पॅकच्या रोजच्या वापराने चेहऱ्याचा रंगही उजळ होतो.
Published at : 31 May 2023 11:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)