एक्स्प्लोर
Raksha Bandhan 2023: रक्षाबंधनानिमित्त बहिणीला काय गिफ्ट द्यावं विचार करताय? शेवटच्या क्षणी 'हे' पर्याय ठरतील उपयुक्त
Raksha Bandhan Gift Ideas: रक्षाबंधन हा बहिण-भावाच्या प्रेमाचं प्रतिक असलेला हा दिवस आहे. या दिवशी भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो. पण अनेकांना काय भेटवस्तू द्यावी, हे सूचत नाही.
Raksha Bandhan Gift Ideas
1/10

बहिणीला गिफ्ट देण्यासाठी बरेच ऑप्शन उपलब्ध आहेत. तुमची बहिण कितीही लहान किंवा मोठी असेल तरी तिला मेकअपचं साहित्य नक्कीच आवडत असेल. त्यामुळे बहिणीला तुम्ही लिपस्टिक, मेकअप बॉक्स, काजळ, नेलपेंट, आयलायनर भेट देऊ शकता.
2/10

सध्या बहुतेक जणींना कपडे साठवण्याची आवड असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या बहिणीला जीन्स-टॉप्स किंवा कुर्ती भेट देऊ शकता.
3/10

झुमके हा मुलींचा आवडीचा दागिना आहे. लहान किंवा मोठे झुमके, डायमंडचे झुमके, गोल झुमके, मोत्यांचे झुमके, कॉर्पोरेट लुक देणारे छोटे कानातले खरेदी करुन तुम्ही बहिणीला भेट देऊ शकता.
4/10

नेकलेस सेट हा देखील गिफ्टचा चांगला पर्याय आहे. तुमचं बजेट जास्त असेल तर हा भेटवस्तू देण्याचा चांगला पर्याय आहे.
5/10

पर्स हा सगळ्यात सोपा ऑप्शन आहे. अगदी 100 रुपयांपासून तुम्हाला विविध पर्स मिळू मिळतात.
6/10

तुमच्या बहिणीला तुम्ही हेडफोन देखील गिफ्ट करू शकता. हे एक बेस्ट गिफ्ट ठरेल.
7/10

हातातील घड्याळ देखील गिफ्टचा बेस्ट ऑप्शन ठरेल.
8/10

तुमच्या बहिणीला वाचनाची आवड असेल तर तुम्ही पुस्तकं भेट देऊ शकता.
9/10

स्किन केअर प्रोडक्ट्स देखील तुम्ही बहिणीला गिफ्ट करू शकता. फेसवॉश, बॉडीवॉश, स्किन लोशन, सनस्क्रीन तुम्ही भेट देऊ शकता.
10/10

परफ्युम हा सर्वसाधारण भेटवस्तूचा प्रकार आहे, ऐन वेळी गिफ्ट म्हणून तुम्ही बहिणीला परफ्युम गिफ्ट करू शकता.
Published at : 29 Aug 2023 10:22 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























