एक्स्प्लोर
Parenting Tips for Father : मुलाच्या योग्य संगोपनासाठी फक्त आईच नाही तर वडीलही तितकेच जबाबदार असतात, 'या' 7 गोष्टी तुम्हाला बनवतील सुपर डॅड
मुलांची काळजी घेणे हा आईबरोबरच वडिलांचाही अधिकार आहे. मुले बऱ्याच गोष्टी वडिलांच्या पाहून शिकतात.
Parenting Tips for Father
1/10
![मुलांना चांगली व्यक्ती बनवण्यासाठी पालकांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. वडीलांचे वागणे आणि लोकांसोबतचे त्यांचे वागणे मुलांच्या विकासावर खूप प्रभाव टाकतात. एक जबाबदार वडील नेहमी आपल्या मुलांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या चांगले वातावरण मिळावे आणि मूलंही त्यांच्या समस्या मोकळेपणाने मांडू शकेल यासाठी प्रयत्न करत असतात.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मुलांना चांगली व्यक्ती बनवण्यासाठी पालकांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. वडीलांचे वागणे आणि लोकांसोबतचे त्यांचे वागणे मुलांच्या विकासावर खूप प्रभाव टाकतात. एक जबाबदार वडील नेहमी आपल्या मुलांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या चांगले वातावरण मिळावे आणि मूलंही त्यांच्या समस्या मोकळेपणाने मांडू शकेल यासाठी प्रयत्न करत असतात.
2/10
![मुले जेव्हा त्यांच्या वडीलांच्या आसपास असतात तेव्हा त्यांना सुरक्षित वाटते. जेव्हा मुलांना सुरक्षित वाटते तेव्हा ते त्यांच्या कामावर आणि इतर गोष्टींवर अधिक चांगले लक्ष केंद्रित करू शकतात. त्यामुळे, आपल्या मुलांना समजावून सांगणे आणि त्यांना कोणत्याही समस्येपासून वाचवण्यासाठी वडिल म्हणून तुम्ही नेहमीच जवळ असाल याची जाणीव करून देणे ही वडीलांची जबाबदारी आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मुले जेव्हा त्यांच्या वडीलांच्या आसपास असतात तेव्हा त्यांना सुरक्षित वाटते. जेव्हा मुलांना सुरक्षित वाटते तेव्हा ते त्यांच्या कामावर आणि इतर गोष्टींवर अधिक चांगले लक्ष केंद्रित करू शकतात. त्यामुळे, आपल्या मुलांना समजावून सांगणे आणि त्यांना कोणत्याही समस्येपासून वाचवण्यासाठी वडिल म्हणून तुम्ही नेहमीच जवळ असाल याची जाणीव करून देणे ही वडीलांची जबाबदारी आहे.
3/10
![वडील हे मुलांना संपूर्ण जग त्यांच्या नजरेतून दाखवतात. वडीलांच्या नजरेतून मुले संपूर्ण जगाला परिचित होतात आणि वडील त्यांना चांगले मार्गदर्शन करू शकतात.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
वडील हे मुलांना संपूर्ण जग त्यांच्या नजरेतून दाखवतात. वडीलांच्या नजरेतून मुले संपूर्ण जगाला परिचित होतात आणि वडील त्यांना चांगले मार्गदर्शन करू शकतात.
4/10
![वडीलांची जबाबदारी केवळ त्यांना मार्गदर्शन करणे किंवा त्यांना ज्ञान देणे नाही, तर वडील त्यांच्या प्रेमाने मुलांचे मनोबल वाढवण्याचे कामही करू शकतात.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
वडीलांची जबाबदारी केवळ त्यांना मार्गदर्शन करणे किंवा त्यांना ज्ञान देणे नाही, तर वडील त्यांच्या प्रेमाने मुलांचे मनोबल वाढवण्याचे कामही करू शकतात.
5/10
![जेव्हा वडील आपल्या जीवनसाथीबद्दल प्रेम आणि आदर दाखवतात, तेव्हा मुले देखील त्यांच्या आईचा आणि इतर मोठ्यांचा आदर करायला शिकतात. वडीलांनी कधीही आपल्या मुलांच्या आईचा अपमान करू नये.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
जेव्हा वडील आपल्या जीवनसाथीबद्दल प्रेम आणि आदर दाखवतात, तेव्हा मुले देखील त्यांच्या आईचा आणि इतर मोठ्यांचा आदर करायला शिकतात. वडीलांनी कधीही आपल्या मुलांच्या आईचा अपमान करू नये.
6/10
![जेव्हा वडील मुलांसोबत चांगला वेळ घालवतात तेव्हा तो क्षण मुलांसाठी संस्मरणीय असतो. तुम्ही मुलांसोबत किती वेळ घालवत आहात हे महत्त्वाचे नाही, तुम्ही त्यांच्यासोबत किती चांगला वेळ घालवत आहात हे महत्त्वाचे आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
जेव्हा वडील मुलांसोबत चांगला वेळ घालवतात तेव्हा तो क्षण मुलांसाठी संस्मरणीय असतो. तुम्ही मुलांसोबत किती वेळ घालवत आहात हे महत्त्वाचे नाही, तुम्ही त्यांच्यासोबत किती चांगला वेळ घालवत आहात हे महत्त्वाचे आहे.
7/10
![वडीलांनी आपल्या मुलांना शिस्त शिकवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. आपल्या मुलांकरता काही गोष्टी ठरवणे गरजेचे आहे. जेणेकरून ते काय करू शकतात आणि काय करू शकत नाहीत हे त्यांना समजेल.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
वडीलांनी आपल्या मुलांना शिस्त शिकवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. आपल्या मुलांकरता काही गोष्टी ठरवणे गरजेचे आहे. जेणेकरून ते काय करू शकतात आणि काय करू शकत नाहीत हे त्यांना समजेल.
8/10
![जेव्हा मुलं वडीलांना जबाबदारी घेताना पाहतात तेव्हा ते आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर जबाबदारी घ्यायला शिकतात.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
जेव्हा मुलं वडीलांना जबाबदारी घेताना पाहतात तेव्हा ते आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर जबाबदारी घ्यायला शिकतात.
9/10
![जर तुम्हाला चांगले वडील व्हायचे असेल तर मुलांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घ्या, मुलाचे संरक्षण करणे ही देखील वडीलांची जबाबदारी आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
जर तुम्हाला चांगले वडील व्हायचे असेल तर मुलांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घ्या, मुलाचे संरक्षण करणे ही देखील वडीलांची जबाबदारी आहे.
10/10
![वडील म्हणून मुलाची चूक सुधारणे आणि त्याबद्दल त्याला सांगणे, मुलाची चूक सुधारण्याचा प्रयत्न करणे ही तुमची जबाबदारी आहे. मात्र हे करताना त्यांना रागावून किंवा मारून सांगण्याची गरज नाही.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
वडील म्हणून मुलाची चूक सुधारणे आणि त्याबद्दल त्याला सांगणे, मुलाची चूक सुधारण्याचा प्रयत्न करणे ही तुमची जबाबदारी आहे. मात्र हे करताना त्यांना रागावून किंवा मारून सांगण्याची गरज नाही.
Published at : 28 Sep 2023 04:46 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
बीड
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)