एक्स्प्लोर
Multani Face Pack : तेलकट आणि कोरड्या त्वचेसाठी वापरा 'हा' फेसपॅक
Multani Face Pack : मुलतानी माती ही त्वचेसाठी नैसर्गिक औषध आहे जी आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्स, टॅनिंग आणि डाग कमी करते.
Multani Face Pack
1/10

मुलतानी माती त्वचेसाठी एक नैसर्गिक वरदान मानली जाते. ती आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्स, टॅनिंग आणि डाग कमी करण्यास मदत करतं.
2/10

याशिवाय मुलतानी माती लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो आणि आपला चेहरा ताजेतवाने दिसून येतो.
3/10

बाजारातील केमिकलयुक्त प्रोडक्ट्सपेक्षा मुलतानी माती सुरक्षित असते. ती त्वचेला कोणतेही दुष्परिणाम न करता सौंदर्य टिकवून ठेवते.
4/10

ज्या लोकांची त्वचा तेलकट आहे त्यांनी गुलाबपाण्यासोबत मुलतानी माती मिसळून एकत्र करून त्याची पेस्ट तयार करावी.
5/10

ही पेस्ट चेहऱ्यावर हलक्या हातांनी लावून 15 मिनिटांनी धुवा. यामुळे चेहरा स्वच्छ आणि फ्रेश दिसून येतो.
6/10

तेलकट त्वचेसाठी हळद आणि मुलतानी मातीचा फेसपॅकही उपयुक्त आहे. दोन चमचे मुलतानी माती आणि चिमूटभर हळद पाण्यात मिसळा.
7/10

हा फेसपॅक 15 मिनिटं ठेवून नंतर धुवा. यामुळे तुमच्या चेहऱ्यवरील पिंपल्स आणि दाणे कमी होतील.
8/10

कोरड्या त्वचेसाठी काकडीचा रस आणि मुलतानी माती मिक्स करा. हा पॅक चेहऱ्यावर 10 मिनिटं ठेवून नंतर धुवा.
9/10

त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी दोन चमचे मुलतानी मातीमध्ये थोडी कॉफी आणि एक चमचा मध मिसळून फेसपॅक तयार करा.
10/10

(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यातील कोणत्याही आकडेवारीचा दावा करत नाही.)
Published at : 31 Oct 2025 05:18 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
विश्व
व्यापार-उद्योग
























